Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश अयोध्येत प्रभूरामाला फूलमाळा घालण्यास भाविकांना मनाई? सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी

अयोध्येत प्रभूरामाला फूलमाळा घालण्यास भाविकांना मनाई? सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी

Subscribe

प्रयागराज : देश तसेच विदेशातील कोट्यवधी हिंदूंना प्रतीक्षा असलेले अयोध्येतील राममंदिर पुढच्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात भाविकांसाठी खुले होणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी भाविकांमध्ये रामाचे दर्शन कसे होणार, याची उत्सुकता वाढू लागली आहे. मंदिरात काय व्यवस्था असेल आणि त्यांना देवाची पूजा कशी करता येईल, याची माहिती समोर आली आहे.

मंदिराच्या उद्घाटनानंतर भाविकांना रामाचे दर्शन घेता येईल, परंतु त्यांना फुलांचे हार किंवा नारळ यासारख्या वस्तू अर्पण करता येणार नाहीत. एवढेच नाही तर, भाविकांना मंदिरात प्रसादही मिळणार नाही. सुरक्षेचे कारणास्तव मंदिर प्रशासनाकडून ही खबरदारी घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पोस्ट-कोविड फुफ्फुसांच्या फायब्रोसिसची समस्या

मंदिर परिसराची सुरक्षा लक्षात घेऊन देवाच्या मुख्य मूर्तीला फुले, हार किंवा नारळ अर्पण करण्यावर बंदी असेल. भाविकांना देवाच्या दर्शनासाठी रांगेत एकाच ठिकाणी फुले व हार घेऊन जाता येणार आहे. तेथे ते जमा केले जाईल आणि ते प्रभू रामाला अर्पण केले मानले जाईल, असे सांगण्यात येते. देशातील अनेक प्रमुख मंदिरांमध्ये अशीच व्यवस्था आधीपासूनच आहे. तिथे मूर्तीला वाहण्यासाठी फुलांचे हार नेण्याची परवानगी नाही. मुख्य मूर्तीच्या दर्शनापूर्वी अलीकडेच ते जमा केले जातात. प्रभू रामाचे दर्शन घेतल्यानंतर भाविक मंदिराबाहेर पडल्यानंतर दुसऱ्या टोकाला श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सेवकांकडून भक्तांना पॅकबंद प्रसाद दिला जाईल. सध्या माता वैष्णोदेवी धाममध्येही अशीच व्यवस्था सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा – ‘या’ ठिकाणी अनोख्या पद्धतीने साजरी होते नागपंचमी

राम मंदिर सर्व सामान्यासाठी खुले झाल्यानंतर प्रभू रामाच्या मूर्तीला स्पर्श करता येणार नाही. अयोध्येमध्ये राम मंदिरात प्रभू श्री रामचंद्राच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश करता येणार नाही. तर भाविकांना मंदिरात अंदाजे 35 फूट अंतरावरून दर्शन घेता येणार आहे, अशी माहिती मंदिराच्या ट्रस्टने आधीच दिली आहे. राम मंदिरात पुजारी आणि कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच पुजाऱ्यांच्या निवासाची तसेच वैद्यकीय सुविधांबरोबरच निवास भत्ताही पुजारी आणि कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे, अशी माहिती रामजन्मभूमीचे मुख्य आर्किटेक्ट आचार्य सत्येंद्र दास यांनी अलीकडेच दिली आहे.

- Advertisment -