घरदेश-विदेशदेवदर्शनाच्या रांगेत उभे असलेल्या भाविकांना लागला विजेचा शॉक; 20 जण गंभीर

देवदर्शनाच्या रांगेत उभे असलेल्या भाविकांना लागला विजेचा शॉक; 20 जण गंभीर

Subscribe

2 ते 14 नोव्हेंबर दरम्यान वार्षिक हसनांबा यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरातून हजारो भाविक दररोज दर्शनासाठी मंदिरात येतात.

बंगळुरू : कर्नाटक राज्यामधील हसन जिल्ह्यातील हसनांबा मंदिरात देवदर्शनाच्या रांगेत उभे असलेल्या भाविका विजेचा शॉक लागला. ही घटना शुक्रवारी (10 नोव्हेंबर) घडली. विजेची तार तुटून खांबांवर आदळल्याने खांबामध्ये विजेचा प्रवाह पोहचला. यामुळे तब्बल 20 हून अधिक जणांना विजेचा शॉक लागल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मंदिर परिसरात पोहचताच भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. (Devotees standing in line for God Darshan got electric shock 20 people are critical)

- Advertisement -

2 ते 14 नोव्हेंबर दरम्यान वार्षिक हसनांबा यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभरातून हजारो भाविक दररोज दर्शनासाठी मंदिरात येतात. शुक्रवारी सकाळपासूनच मंदिरात भाविकांची गर्दी होती. देवीच्या दर्शनासाठी भाविक रांगेत उभे होते. दरम्यान, विद्युत तार तुटून मंदिराच्या खांबाला स्पर्श झाल्याने खांबाजवळ रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना विजेचा शॉक लागला. या घटनेमुळे मंदिर परिसरात खळबळ उडून भाविक सैरवैर धावू लागले. यामध्ये चेंगराचेंगरी होऊन अनेकजण जखमीसुद्धा झाले.

हेही वाचा : मोदी ओबीसी असल्याचे सांगतात मात्र…; जात जनगणनेचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधींचा निशाणा

- Advertisement -

शॉक लागल्याची माहिती मिळताच उडाला गोंधळ

भाविकाना विजेचा शॉक लागल्याची माहिती हवेसारखी मंदिर परिसरात पसरली. यामुळे महिला भाविक इकडे तिकडे धावू लागल्या. यावेळी चेंगराचेंगरीसुद्धा झाली. भाविक एकमेकांवर जोरात धडकले. यादरम्यान अनेक भाविक जमिनीवर पडून जखमी झाले. मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेत गुंतलेल्या पोलीस पथकाने परिस्थिती नियंत्रणात आणखी आणि जखमींना गर्दीतून बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात नेले. सुमारे 20 भाविक जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच हसन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहम्मद सुजीत यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

हेही वाचा : पवार कुटुंब एकत्र; अजित पवारांसोबत झालेल्या भेटीवर शरद पवारांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया

एसपी हसन यांनी सांगितले घटनेविषयी

जिल्हा पोलीस अधीक्षक मोहम्मद सुजीत म्हणाले की, शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास तुटलेली इलेक्ट्रिक वायर लटकत होती तेव्हा लोक त्याखाली आले. यावेळी त्यांना विजेचा शॉक लागला. काहींना विजेचा शॉक लागत आहे हे बघताच मागे असलेले भाविक घाबरून इकडे तिकडे धावू लागले. दरम्यान सध्या पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहेत. काही लोकांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. प्रचंड गर्दीमुळे दर्शनासाठी कमी वेळ मिळतो. सध्या सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -