घरCORONA UPDATECorona : हे ठरू शकतं कोरोनावर रामबाणं औषध; ब्रिटनमध्ये संशोधन सुरू

Corona : हे ठरू शकतं कोरोनावर रामबाणं औषध; ब्रिटनमध्ये संशोधन सुरू

Subscribe

जगभरात गेल्या सात महिन्यांपासून (covid 19) कोरोनाने थैमान घातले असून त्यावरील लस शोधून काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कित्येक देशांमध्ये विविध स्तरावर कोरोनावरील औषधांच्या चाचण्या होत असून या दरम्यान ब्रिटनमधून आशा पल्लवीत करणारी बातमी येत आहे. ब्रिटनमध्ये (dexamethasone) ‘डेक्सामेथासोन स्टेरॉयड’ च्या (Large randomized clinical trial) ‘लार्ज रँडमाइज्ड क्लिनिकल ट्रायल’ चा अंतिम अहवाल समोर आला असून शुक्रवारी आलेल्या या अहवालामध्ये या औषधामुळे कोरोनाबाधित रूग्णांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

(New England Journal of Medicine) न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये शुक्रवार प्रसिद्ध झालेल्या पत्रकानुसार हाय रिस्क स्टेजवर असलेल्या कोरोना रूग्णावर या औषधाचा वापर करण्यात आला असून त्याच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचे दिसून आले. (Ventilator) व्हेंटिलेटरवर असलेल्या हा कोरोना रूग्ण हे औषध घेऊन बरा होत असल्याचे पाहायला मिळाले. परंतू कोरोनाच्या पहिल्या स्टेजवर असलेल्यांना हे औषध देऊ नका. प्राथमिक टप्प्यावर या औषधाचा वापर केल्यास रूग्णाच्या जीवाला धोका होऊ शकतो, असेही या पत्रकात म्हटले आहे.

- Advertisement -

या औषधाचा प्रयोग आतापर्यंत २ हजार १०४ रूग्णांवर करण्यात आला आहे. त्यांना सलग १० दिवस दररोज ६ मि. ग्रॅ. औषध दिले जात होते. तर ४ हजार ३२१ रूग्णांना जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. चार आठवडे म्हणजेच २८ दिवसानंतर कोरोनाबाधितांच्या मृत्यूची टक्केवारी काढण्यात आली. संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोना रूग्णांच्या मृत्यूचा दर ३६ टक्क्यांनी कमी झाला आहे. या तुलनेत मेकॅनिकल व्हेंटिलेटरच्या मदतीशिवाय ऑक्सिजन मिळणाऱ्या रूग्णांमध्ये १८ टक्क्यांनी कमी झाला आहे. व्हेंटिलेटरवर असलेल्या ज्या रूग्णांना डेक्सामेथासोन हे औषध दिले होते, त्यांच्या मृत्यूची शक्यता २९.३ टक्के इतकी होती. तर औषधाविना व्हेंटिलेटरवर असलेल्या ४१.४ टक्के रूग्णांच्या मृत्यूची शक्यता होती. शिवाय व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन लावलेले नसलेल्या रूग्णांवर त्याचा वेगळा परिणाम दिसून आला आहे.

हेही वाचा –

CoronaVirus: जगात झपाट्याने होतोय संसर्ग; १०० तासांत दहा लाख रूग्णवाढ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -