घरदेश-विदेशAir India : मैत्रिणीला कॉकपिटमध्ये नेणाऱ्या पायलटसह सहकाऱ्यांवर डीजीसीएची कारवाई

Air India : मैत्रिणीला कॉकपिटमध्ये नेणाऱ्या पायलटसह सहकाऱ्यांवर डीजीसीएची कारवाई

Subscribe

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या (Air India) एका पायलटने आपल्या मैत्रिणीला कॉकपिटमध्ये नेले होते. एअर इंडियाच्या दुबई-दिल्ली या फ्लाइटमध्ये घडलेल्या या घटनेची गंभीर दखल नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) घेतली आहे. डीजीसीएने तपास पूर्ण होईपर्यंत या घटनेशी संबंधित संपूर्ण कर्मचाऱ्यांना (Cabin crew member) हटविण्याचे आदेश डीजीसीए जारी केले आहेत.

ही घटना 27 फेब्रुवारी 2023 रोजी घडली होती. दुबईहून दिल्लीला येणाऱ्या विमानातील पायलटला आपल्या मैत्रिणीला खास अनुभव द्यायचा होता. यासाठी त्याने डीजीसीएच्या नियमांचे उल्लंघन केले. वैमानिकाने केबिन क्रूला विशिष्ट सूचना दिल्या होत्या. जेव्हा त्याची मैत्रिण कॉकपिटमध्ये प्रवेश करेल तेव्हा तिचे जोरदार स्वागत करण्यास त्याने सहकाऱ्यांना सांगितले होते. एवढेच नाही तर पायलटने त्याच्या मैत्रिणीला बिझनेस क्लासचे जेवणही दिले. या सर्व प्रकरणाची डीजीसीए चौकशी करत आहे.

- Advertisement -

आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. आम्ही या प्रकरणाची डीजीसीएला देखील तक्रार केली असून, त्यांच्या तपासात सहकार्य करत आहोत. आमच्या प्रवाशांची सुरक्षा आणि कल्याण यापेक्षा महत्त्वाचे काहीही नाही. आम्ही आवश्यक ती कारवाई करू, असे एअर इंडियाने या घटनेनंतर स्पष्ट केले होते.

- Advertisement -

दुबई-दिल्ली फ्लाइटच्या वैमानिकांपैकी एकाने डीजीसीएकडे तक्रार केली होती. प्रथमदर्शनी या प्रकरणात केबिन क्रूचा थेट सहभाग दिसत नाही. परंतु तपास पूर्ण होईपर्यंत संपूर्ण क्रूला हटविण्यास सांगितले आहे, असे डीजीसीएच्या एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले. या आरोपाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित पायलटला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. या प्रकरणी जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत पायलटची सेवाही खंडित राहील, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -