DGCA कडून नियमात मोठा बदल; तिकीट श्रेणी बदलल्यास विमान कंपनीला द्यावे लागणार पैसे परत

DGCA amends ticket refund rules for both domestic and international flyers check details here

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने DGCA) बुधवारी विमान तिकीटांसंबंधीत निमयांत मोठे बदल केले आहेत. यामुळे एअरलाईन कंपनीकडून बोर्डिंगसाठी नकार मिळाल्यास, फ्लाईट रद्द झाल्यास किंवा विमानाचे विलंबाने उड्डाण अशा अनेक कारणांमुळे फटका बसलेल्या प्रवाशांना फायदा होणार आहे.


यामुळे प्रवाशांनी खरेदी केलेल्या श्रेणीच्या तुलनेत सामान्य श्रेणीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही या नियम बदलाचा फायदा होणार आहे. यात खरेदी केलेल्या तिकीटाशिवाय प्रवाशाला सामान्य श्रेणीतून प्रवास करण्यास भाग पडले तर विमान कंपनीला देशांतर्गत करांसह 75 टक्के रक्कम संबंधित प्रवाश्याला परत करावी लागणार आहे.

यात आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबत 1500 किमी किंवा त्यापेक्षा कमी अंतराच्या तिकिटांसाठी 30 टक्के आणि 1500 ते 3500 किमी दरम्यानच्या तिकिटांसाठी 50 टक्के रक्कम परत करावी लागणार आहे. प्रवाशांना परत येणारी रक्कम ही सर्व समावेशक करांसह परत करावी लागणार आहे, याबाबत DGCA कडून याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत.


…त्यांनी मुंबईकरांची माफी मागावी; डान्सबारची उपमा देणाऱ्या राज ठाकरेंविरोधात राष्ट्रवादी आक्रमक