घरदेश-विदेशDGCA : विदेशात जाणाऱ्यांनो जरा थांबा, ३० जूनपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण बंद

DGCA : विदेशात जाणाऱ्यांनो जरा थांबा, ३० जूनपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण बंद

Subscribe

कोणत्याही देशासोबच्या मालवाहतूक आणि कुरिअर सेवेवर बंदी घातलेली नाही.

भारताने कोरोना संकटामुळे नागरी उड्डाण महासंचालनालयाने (DGCA)आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर ३० जूनपर्यंत बंदीची मुदत वाढवली आहे. यानंतर बंदीला मुदतवाढ द्यायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल असे नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए / Directorate General of Civil Aviation – DGCA) जाहीर केले. आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर बंदी असली तरी विमानांद्वारे होणारी मालवाहतूक आणि कार्गो ऑपरेशन कुरिअर सेवा सुरू राहणार आहे. कोणत्याही देशासोबच्या मालवाहतूक आणि कुरिअर सेवेवर बंदी घातलेली नाही. सुरक्षा नियम आणि कोविड प्रोटोकॉलचे पालन करत कामकाज सुरू आहे.

- Advertisement -

नागरी उड्डाण महासंचालनालयाने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर ३० जूनपर्यंत बंदी घातली असली तरी वंदे भारत मोहिमेंतर्गत आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष प्रवासी विमानांची वाहतूक सुरु आहे. तसेच २४ देशांसोबत एअर बबल करारानुसार प्रवासी विमानांची वाहतूक सुरु आहे. तसेच प्रवासी विमानातून भारतात येणाऱ्या तसेच जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला स्वत:च्या तब्येतीविषयी माहिती जाहीर करण्याचे तसेच प्रवास सुरु करण्याआधी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. ज्या देशामध्ये प्रवास करायचा त्या संबंधीत देशातील प्रवाश्याविषयी ना हरकत प्रमाणपत्र आणि प्रवासाच्या २४ ते ७२ तास आधी कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्यासच परवानगी आहे.


Bollywood Drugs Case: सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला एनसीबीकडून अटक


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -