एअर इंडियाला आता दहा लाखांचा दंड; विमान प्राधिकरणाला माहिती न दिल्याचा ठपका

गेल्या वर्षी पॅरिस येथून दिल्ली येथे येणाऱ्या विमान प्रवासात प्रवाशाने गैरवर्तन केले होते. ६ डिसेंबर २०२२ रोजी ही घटना घडली. AI-142 (Paris - New Delhi) या विमानात प्रवासी शौचालयात धुम्रपान करत होता. तो प्रवासी दारू प्यायला होता. विमान कर्माचाऱ्यांचे तो प्रवासी काहीच ऐकत नव्हता. तर दुसरा एक प्रवासी महिलेच्या आसनावर बसला होता. या दोन्ही घटनांची माहिती एअर इंडियाने विमान प्राधिकरणाला दिली नाही, असा ठपका ठेवत विमान प्राधिकरणाने एअर इंडियाला दहा लाखांचा दंड ठोठावला आहे. 

नवी दिल्लीः विमान प्राधिकरणाने एअर इंडियाला दहा लाखांचा दंड ठोठावला आहे. प्रवाशांच्या गैरवर्तनाची माहिती न दिल्याने विमान प्राधिकरणाने एअर इंडियाला हा दंड ठोठावला आहे. याआधी प्रवाशाने विमान प्रवासात ज्येष्ठ महिलेवर लघुशंका केल्याप्रकरणी विमान प्राधिकरणाने एअर इंडियाला ३० लाखांचा दंड ठोठावला आहे.

गेल्या वर्षी पॅरिस येथून दिल्ली येथे येणाऱ्या विमान प्रवासात प्रवाशाने गैरवर्तन केले होते. ६ डिसेंबर २०२२ रोजी ही घटना घडली. AI-142 (Paris – New Delhi) या विमानात प्रवासी शौचालयात धुम्रपान करत होता. तो प्रवासी दारू प्यायला होता. विमान कर्मचाऱ्यांचे तो प्रवासी काहीच ऐकत नव्हता. तर दुसरा एक प्रवासी महिलेच्या आसनावर बसला होता. या दोन्ही घटनांची माहिती एअर इंडियाने विमान प्राधिकरणाला दिली नाही, असा ठपका ठेवत विमान प्राधिकरणाने एअर इंडियाला दहा लाखांचा दंड ठोठावला आहे.

एअर इंडियाच्या विमानात घडलेल्या घटनेची माहिती मिळताच विमान प्राधिकरणाने ५ जानेवारी २०२३ रोजी एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या घटनेची माहिती न दिल्याने एअर इंडियाने विमान प्राधिकरणाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे, असा ठपका विमान प्राधिकरणाने एअर इंडियावर ठेवला. २३ जानेवारी २०२३ रोजी एअर इंडियाने विमान प्राधिकरणाच्या नोटीसला उत्तर दिले. त्यानंतर विमान प्राधिकरणाने एअर इंडियाला दहा लाखांचा दंड ठोठावला.

विमान प्रवासात ज्येष्ठ महिलेवर अन्य प्रवाशाने लघुशंका केल्याप्रकरणी विमान प्राधिकरणाने गेल्याच आठवड्यात एअर इंडियाला ३० लाखांचा दंड ठोठावला आहे. विमान प्रवासात महिलेवर लघुशंका केल्याची घटना गेल्यावर्षी घडली होती. या घटनेची माहिती देणारे पत्र पीडित महिलेने एअर इंडियाला लिहिले होते. पीडित महिला एअर इंडियाच्या फ्लाइट AI-102 ने न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी विमानतळावरून दिल्लीला जात होती. दुपारच्या जेवणानंतर विमानातील लाइट्स बंद करण्यात आले. त्याचवेळी एक मद्यधुंद प्रवासी सीटजवळ आला आणि त्याने माझ्या अंगावर लघुशंका केली. त्यानंतरही तो प्रवासी माझ्या जवळच उभा राहिला. त्यावेळी सहप्रवाशाने समज दिल्यानंतर तो तेथून गेला. परंतु, लघुशंकेमुळे माझे कपडे, बॅग, शूज पूर्णपणे भिजले होते. लघुशंका करणाऱ्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर ती व्यक्ती निघून गेली, असे पीडित महिलेने पत्रात नमूद केले होते. त्यानंतर आरोपी शंकर मिश्राला अटक केली.