घरदेश-विदेशविमानातील लघुशंका प्रकरणात डीजीसीएकडून कारवाईचा बडगा; एअर इंडियाला ३० लाखांचा दंड

विमानातील लघुशंका प्रकरणात डीजीसीएकडून कारवाईचा बडगा; एअर इंडियाला ३० लाखांचा दंड

Subscribe

शंकरला शोधण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने शंकरला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी देण्यास नकार दिला. शंकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याची कोठडी मिळावी म्हणून पोलिसांनी दिल्ली न्यायालयात अर्ज केला आहे.

मुंबईः विमानात लघुशंका केल्याप्रकरणी विमान प्राधिकरणाने (डीजीसीए) एअर इंडियाला ३० लाखांचा दंड ठोठावला आहे. त्या विमानाच्या पायलटचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तसेच विमानात सेवा पुरवणाऱ्या कंपनीलाही तीन लाखांचा दंड प्राधिकरणाने सुनावला आहे.

विमान प्रवासात महिलेवर लघुशंका केल्याची घटना गेल्यावर्षी घडली होती. या घटनेची माहिती देणारे पत्र पीडित महिलेने एअर इंडियाला लिहिले होते. पीडित महिला एअर इंडियाच्या फ्लाइट AI-102 ने न्यूयॉर्कमधील जॉन एफ केनेडी विमानतळावरून दिल्लीला जात होती. दुपारच्या जेवणानंतर विमानातील लाइट्स बंद करण्यात आले. त्याचवेळी एक मद्यधुंद प्रवासी सीटजवळ आला आणि त्याने माझ्या अंगावर लघुशंका केली. त्यानंतरही तो प्रवासी माझ्या जवळच उभा राहिला. त्यावेळी सहप्रवाशाने समज दिल्यानंतर तो तेथून गेला. परंतु, लघुशंकेमुळे माझे कपडे, बॅग, शूज पूर्णपणे भिजले होते. लघुशंका करणाऱ्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर ती व्यक्ती निघून गेली, असे पीडित महिलेने पत्रात नमूद केले होते.

- Advertisement -

पीडित महिलेच्या पत्राची दखल घेत या घटनेच्या चौकशीसाठी एअर इंडियाने अंतर्गत समितीही स्थापन केली. तसेच, त्या प्रवाशाला ‘नो-फ्लाय लिस्ट’मध्ये टाकण्याची शिफारसही करण्यात आली. पोलीस तपासात लघूशंका करणारी व्यक्ती शंकर मिश्रा असल्याचे स्पष्ट झाले. तो काम करत असलेल्या कंपनीने शंकरला कामावरुन काढून टाकले. पीडित महिलेच्या पत्रानंतर शंकर फरार झाला होता.

- Advertisement -

शंकरला शोधण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने शंकरला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडी देण्यास नकार दिला. शंकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याची कोठडी मिळावी म्हणून पोलिसांनी दिल्ली न्यायालयात अर्ज केला आहे.

लघुशंका करणारी व्यक्ती मी नाही. मला याप्रकरणात गोवण्यात आले आहे. कदाचित पीडित महिलेला लघुशंका थांबवून न ठेवण्याचा आजार असावा किंवा अन्य कोणी तिच्यावर लघुशंका केली असावी. विमान प्रवासात महिलेच्या आसनाजवळ जाणे शक्य नव्हते, असा दावा शंकरने न्यायालयात केला आहे. याला पोलिसांनी विरोध केला आहे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -