अप्रशिक्षित पायलटकडून विमानाचे लँडिंग: Air Vistara ला DGCA कडून 10 लाखांचा दंड

विमानात कोणत्याही फर्स्ट ऑफिसरला (First Officer) प्रवासी विमानाला लँड करण्यापूर्वी पहिल्यांदा सिम्युलेटरवर लँड करावे लागते.

dgca imposes rs 10 lakh fine ON AIR vistara airlines FOR untrained pilot executed a plane landing
अशिक्षित पायलटकडून विमानाचे लँडिंग: Air Vistara ला DGCA कडून 10 लाखांचा दंड

विमान वाहतूक नियामक मंडळाने (DGCA) एअरलाईन्स कंपनी ‘विस्तारा’ला सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. (Air Vistara) योग्यरित्या प्रशिक्षित नसलेल्या पायलटला (Pilot) इंदौरमध्ये विमान लँडिंग करण्यास सांगितल्याने हा दंड ठोठावण्यात आला आहे. डीजीसीएने दंड ठोठावताना सांगितले की, फर्स्ट ऑफिसर (First Officer) म्हणून नियुक्त पायलटने सिम्युलेटरमध्ये अपेक्षित ट्रेनिंग घेतल्याशिवाय विमान इंदौर विमानतळावर उतरवले. यामुळे टेक ऑफ आणि लँडिंग क्लिअरन्सच्या उल्लंघन झाले तसेच विमानातील प्रवाशांचा जीवही धोक्यात घालण्यात आला. त्यामुळे हा दंड ठोठावल्याचे डीजीसीएने (DGCA) सांगितले. परंतु या विमानाने नेमक्या कुठून उड्डाण केले होते तसेच ही घटना केव्हा घडली याबद्दलची माहिती स्पष्ट नाही. (DGCA fines Air Vistara)

विमानात कोणत्याही फर्स्ट ऑफिसरला (First Officer) प्रवासी विमानाला लँड करण्यापूर्वी पहिल्यांदा सिम्युलेटरवर लँड करावे लागते. यासाठी एक ट्रेनिंग दिले जाते. यानंतर विमान सुरक्षितरित्या लँड होण्यासाठी योग्य मानले जाते. दरम्यान विमानातील कॅप्टनलाही सिम्युलेटरमध्ये प्रशिक्षण घेणे आवश्यक असते.

मात्र एअर विस्तारातील फर्स्ट ऑफिसरने कॅप्टनसोबत नसताना तसेच सिम्युलेटर ट्रेनिंग न घेता विमान इंदौर विमानतळावर लँडिंग केले. हा प्रकार प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणारा होता. DGCA ने विस्तारा एअरलाईन्सच्या या प्रकाराची इंदौर विमानतळावर नोंद घेतली. तसेच विस्तारावर कारवाई करत हा दंड ठोठावला आहे. (Air Vistara fined)

अलीकडेच झालेल्या एका पाहणी अहवालानुसार, कोरोना महामारीनंतर देशातील एअरलाईन्स कंपन्यांची ग्राहक सेवा आणि स्टाफच्या गैरवर्तणुकीच्या घटना वाढत आहे. यात 80 टक्के प्रवाशांनी एअरलाईन्स कंपन्या प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचे सांगितले. अशात अलीकडेच(Indigo) एअरलाईन्सवर दिव्यांगाला प्रवास करू न दिल्याने 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.


परवानगीशिवाय गाणं प्रदर्शित केल्यास कारवाई करू, सिद्धूच्या कुटुंबियांकडून निर्मात्यांना सूचना