डीजीसीएची स्पाइसजेटला कारणे दाखवा नोटीस, विमानात १८ दिवसांत ८ वेळा बिघाड

dgca sends notice to spicejet airline seeks response on eight fault incidents in last 18 day

मागील काही दिवसांपासून स्पाइसजेटच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना समोर येत आहेत. या घटनांमुळे अनेकदा प्रवाशांचा जीव धोक्यात घालून विमानांचे आपत्कालीन लँडिंग करण्याची वेळ देखील येत आहेत. स्पाइसजेटच्या विमानांत तांत्रिक बिघाड होण्याच्या गेल्या १८ दिवसांत वेगवेगळ्या आठ घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA)स्पाइसजेट विमान कंपनीला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

DGCA ने सप्टेंबर 2021 मध्ये स्पाईसजेटच्या केलेल्या ऑडिटमध्ये असे आढळून आले की, स्पेअर्स पुरवठादारांना नियमितपणे पैसे दिले जात नाहीत, ज्यामुळे स्पेअरची कमतरता येत होती. यावेळी DGCA ने म्हटले होते की, स्पाईसजेट विमान कंपनी नियम, 1937 अंतर्गत सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह हवाई सेवा सुनिश्चित करण्यात अयशस्वी ठरली आहे. दरम्यान मंगळवारी स्पाइसजेटच्या दोन विमानांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्याने त्या विमानांचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या घटनांची डीजीसीएकडून चौकशी सुरु आहे. याचबरोबर मागील घटनांचा देखील तपास सुरु आहे. मात्र सातत्याने विमानांमध्ये तांत्रिक त्रुटी येत आढळत असल्याने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) ने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

त्याच दिवशी कांडला-मुंबई विमान महाराष्ट्राच्या राजधानीत विंडशील्डच्या मध्यभागी तडा गेल्याने उतरवण्यात आले. मंगळवारी या दोन घटना समोर आल्यानंतर गेल्या १८ दिवसांत स्पाइसजेटच्या विमानातील तांत्रिक बिघाडाच्या ८ घटना समोर आल्या आहेत. डीजीसीएच्या म्हणण्यानुसार या सर्व घटनांची गांभीर्याने चौकशी सुरू आहे.

मंगळवारी घडल्या आणखी दोन घटना

दरम्यान अलीकडेच स्पाइसजेटच्या बोईंग 737 मालवाहू विमानाच्या वेदर रडारमध्ये बिघाड झाल्याने विमान कोलकात्यात परत पाठवण्यात आले, हे विमान कोलकात्याहून चीनमधील चोंगकिंगला जात होते, मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमानाचे कोलकात्यात सुरक्षित लँडिंग करण्यात आले.

या मालवाहतूक विमानाच्या अपघातापूर्वी मंगळवारी स्पाइसजेटच्या दोन विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना समोर आल्या. यातील पहिला घटना दिल्ली- दुबई विमानात घडली. दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेट विमानाच्या इंडिकेरमध्ये बिघाड आढळून आला. त्यामुळे विमानाचे पाकिस्तानातील कराची येथे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.

त्याचदिवशी स्पाइसजेटच्या आणखी एका विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या विमानाच्या विंडशील्डला तडा गेल्याने हे विमान मुंबई विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घ्यावा लागला. स्पाइसजेटचे Q-400 हे विमान घटनेवेळी 23 हजार फूट उंचावर होते.

तर याच महिन्यात म्हणजे २ जुलैला स्पाइसजेटच्या दिल्ली- जबलपूर या विमानातून धूर निघू लागल्याने विमान दिल्ली विमानतळावर पुन्हा इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. सकाळी 6.15 वाजता दिल्ली विमानतळावरून उड्डाण केलेले हे विमान घटनेवेळी विमान 5000 फूट उंचीवर होते. यावेळी अचानक विमानातून धूर निघू लागला.

तर 19 जून रोजी पाटणा विमानतळावर स्पाईसजेट विमानाच्या डाव्या पंखातून टेकऑफच्या वेळी ठिणग्या निघू लागल्या होत्या, या घटनेमुळे विमानाचे पाटण्यातच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या सर्व घटनांची आता डिजीसीएने गांभीर्याने दखल घेतली आहे.


हिमाचलमध्ये ढगफुटी! नदी-नाल्यांना पूर, आठ जणांच्या मृत्यूची शक्यता