घरदेश-विदेशDGCA चा आदेश! १५ जुलैपर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द

DGCA चा आदेश! १५ जुलैपर्यंत सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द

Subscribe

भारतात कोरोनामुळे २३ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा बंद करण्यात आली होती.

भारत सरकारने शुक्रवारी सांगितले की, आंतरराष्ट्रीय व्यापार प्रवासी सेवा येत्या १५ जुलै पर्यंत स्थगित करण्यात येणार आहे. नागरी उड्डाण महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation) शुक्रवारी सांगितले की, ते देशातील आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांची उड्डाणे रद्द करण्याची मुदत १५ जुलैपर्यंत वाढवत आहोत. परंतु निवडक मार्गांवरील काही आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण सेवांना परवानगी दिली जाऊ शकते. दरम्यान भारतात कोरोना विषाणूच्या साथीमुळे २३ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा बंद करण्यात आली होती.

- Advertisement -

डीजीसीएच्या परिपत्रकानुसार, ” या अधिकारांतर्गत असा निर्णय घेण्यात आला आहे की १५ जुलै, २०२० रोजी रात्री ११.५९ पर्यंत भारतातून आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी सेवा बंद ठेवण्यात येतील.” त्यात असेही म्हटले आहे की, “एखाद्या आंतरराष्ट्रीय मार्गावर निवडलेल्या काही ठराविक मार्गांवर आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणांना परवानगी देण्यात येऊ शकते. ”

एअर इंडिया आणि इतर खासगी देशांतर्गत विमान कंपन्या वंद भारत मिशन अंतर्गत आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवित आहेत. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परदेशात आणण्यासाठी आणि येथे अडकलेल्या परदेशी लोकांना त्यांच्या देशात घेऊन जाण्यासाठी केंद्र सरकारने २५ मे रोजी हे अभियान सुरू केले. दोन महिन्यांच्या अंतरानंतर २५ मेपासून भारताने स्थानिक प्रवासी उड्डाण सेवा पुन्हा सुरू केली आहे.


‘हा’ SmS तुमचे बँक खाते करु शकतो रिकाम! बँकेने दिला सतर्कतेचा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -