Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona Treatment: फक्त ७ दिवसात कोरोनावर मात, Zydus Cadila च्या औषधाला DGCI...

Corona Treatment: फक्त ७ दिवसात कोरोनावर मात, Zydus Cadila च्या औषधाला DGCI ची मंजूरी

Related Story

- Advertisement -

वर्षांच्या सुरुवातीपासून कोरोना विषाणूला थोपविण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यातला महत्त्वाचा निर्णय म्हणजे देशात आपात्कालीन वापरासाठी दोन लसींना मान्यता देण्यात आली. एक म्हणजे सीरम इन्स्टिट्यूची ऑफ इंडियाची ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’. या दोन लसींना ३ जानेवारीला DCGI कडून आपात्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली. त्यानंतर देशात कोणती लस कोरोनाशी लढण्यासाठी येईल. याच प्रतिक्षेत असताना एप्रिल महिन्यांत रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला DCGI कडून मंजूरी मिळाली. आता कोरोनाचे औषधं भारतात येणार आहे. कारण झायडस कॅडिलाचे (Zydus Cadila’s) ‘विराफिन’ (Virafin) औषधाला आपात्कालीन वापरासाठी DCGI कडून मान्यता मिळाली आहे.

- Advertisement -

सध्याच्या कोरोनाच्या परिस्थिती लसींपासून रेमडेसिवीर इंजेक्शनपर्यंत अनेक गोष्टीचा तुटवडा भासत आहे. या सर्व दरम्यान पॉझिटिव्ह अशी बातमी आज समोर आली आहे ती म्हणजे DCGI कडून झायडस कॅडिलाच्या औषधला मंजूरी मिळाली आहे. माहितीनुसार कोरोनावर झायडस कॅडिलाचे ‘विराफिन’ हे औषधं ९१.१५ टक्के प्रभावी असल्याचे सांगण्यात आलं असून हे औषध घेतल्यानंतर ७ दिवसात कोरोना बरा होतो असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

झायडस कॅडिलाच्या या औषधांचे क्लिनिकल ट्रायल झाले असून यामध्ये ९१ टक्के जास्त कोरोनाबाधित लोकांना फायदा झाल्याचे समोर आले. ७ दिवसांमध्ये कोरोनाबाधित लोकांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली आहे. एवढेच नाहीतर जे ऑक्सिजनवर रुग्ण होते त्यांना हे औषधं दिल्यामुळे त्यांच्या ऑक्सिजन वापराचे प्रमाण कमी झाले आहे, असे निष्कर्षातून निघाले आहे. दरम्यान जरी आज DCGI कडून आपात्कालीन वापरासाठी या औषधाला मान्यता मिळाली असली तरी हे औषधं सर्वांना दिले जाणार नाही आहे. हे औषधं फक्त प्रौढांना आणि जे रुग्ण देखरेखी खाली आहेत त्यांच्या वापरासाठी मिळणार आहे. गंभीर रुग्णांना हे औषधं दिले जाणार नाही आहे.

- Advertisement -