नवी दिल्ली – महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणीने जोर धरला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनावर ठाम आहेत. मात्र राज्यातील महायुती सरकार धनंजय मुंडे यांना वारंवार अभय देत आहे. दुसरीकडे धनंजय मुंडे यांच्या पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःच धनंजय मुंडे यांनीच आता राजीनाम्याचा निर्णय घेतला पाहिजे, असे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या पक्षात नैतिकता उरली आहे का, असा सवाल करत ते म्हणाले की, मस्साजोग ग्रामस्थांच्या तीव्र भावना पाहिल्या तर आत्मसन्मान असलेली व्यक्ती पदावर राहणार नाही, मात्र त्यांचे आणि नैतिकतेचे काही घेणेदेणे आहे असे वाटत नाही, असा टोला शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्यासह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला. असा टोला लगावला आहे.
दिल्लीत झालेल्या 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टीका केली. साहित्य संमेलनाच्या मुलाखती दरम्यान त्यांनी ठाकरे गटावर बोचरी टीका केली. त्यानंतर ठाकरे गटाकडून संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनीही गोऱ्हे यांच्या वक्तव्याला जबाबदार धरले. यावर आज सायंकाळी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन नीलम गोऱ्हेंचे वक्तव्य मुर्खपणे असल्याचे म्हटले. यावेळी मस्साजोग आणि धनंजय मुंडे यांच्यासंबंधी देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आले.
हेही वाचा : Dhananjay Munde : धनंजय मुंडे आणखी संकटात; करुणा मुंडेंची पुन्हा न्यायालयात धाव, हे आहे कारण
नैतिकता आणि यांचा काही संबंध नाही…
बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने होऊन गेले. यातील एक आरोपी अद्याप फरार आहे. तर सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे हे राजीनामा द्यायला तयार नाही, असे शरद पवारांना विचारण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा म्हणाले, मी मस्साजोग गावाला जाऊन आलो आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या तीव्र भावना पाहिल्या तर स्वाभीमान आणि आत्मसन्मान असलेली कोणतीही व्यक्ती त्या पदावर राहणार नाही. सबंध राज्यात या मुद्यावरुन एवढं आंदोलन सुरु आहे, असं असताना आपण सत्तेला चिकटून राहणं बरोबर नाही.
अजित पवारांचे नाव न घेता शरद पवार म्हणाले की, माझी माहिती अशी आहे की, याआधी काही लोकांवर अशा प्रकारचे आरोप झाले. तेव्हा त्यांना सत्ता सोडावी लागली आणि त्यांची चौकशी झाली.
नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे, या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, नैतिकतेशी या लोकांचा काही संबंध आहे, असं मला जाणवत नाही. त्यामुळे त्यावर कशाला भाष्य करायचे, असे म्हणत शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्यासह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला.
हेही वाचा : Devendra Fadnavis: पंतप्रधान किसान सन्मान निधी आता होणार 15 हजार; देवेंद्र फडणवीसांची घोषणा