Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Dharwad Accident: शाळकरी मैत्रिणींचा 'हा' सेल्फी ठरला अखेरचा!

Dharwad Accident: शाळकरी मैत्रिणींचा ‘हा’ सेल्फी ठरला अखेरचा!

Related Story

- Advertisement -

बेळगावातील धारवाडा तालुक्यात आज पहाटे टेम्पो आणि टिप्परमध्ये (मिनी बस) भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ११ जणांच्या दुर्दैवी मृत्यू झाला असून यामधील १० महिल जागीच ठार झाल्या. तसेच इतर ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे त्यांना उपचाराकरिता धारवाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील टिप्परमधून एकूण १७ महिला गोव्याला जात असताना काळाने घात केला. या शाळेच्या मैत्रिणी होत्या. त्यांचा शेवटचा फोटो सध्या चर्चेत आला आहे.

व्हायरल होतोय शाळकरी मैत्रिणींचा ‘हा’ सेल्फी

मकर संक्रांत साजरी करणाऱ्यासाठी या १७ महिला गोव्याला जात होत्या. यादरम्यान गोव्याला पोहोचण्यापूर्वीच धारवाडा जवळ त्यांच्या टिप्परने टेम्पो ड्रायव्हरला धडक दिली आणि यामध्ये १० महिलांचा मृत्यू झाला. टिप्परमधला त्याच्या शेवटचा सेल्फी सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होत आहे. या महिलांचा ग्रुपमधील एकीने दावणगेरेपासून सुरुवात करण्यापूर्वी एक सेल्फी क्लिक केला होता आणि यामधील एकीने हाच सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केला आणि लिहिले की, ‘गो गोवा विथ स्कूल बडिज’

- Advertisement -

बेळगावातील धारवाड तालुक्यातील इटगट्टी गावाजवळ टेम्पो आणि टिप्परचा आज पहाटे ३ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. टिप्परने टेम्पो ट्रॅव्हलरला धडक दिल्याने हा अपघात झाला. यामुळे दुर्दैवाने प्रवासात झोपेत असलेल्या महिलांवर संक्रांत कोसळली. या अपघातात १ पुरुष आणि १० महिलांचा जागीच मृत्यू झाला. संक्रांत साजरी करण्यासाठी गोव्याला पोहोचण्यापूर्वीच १७ जणींनमधील १० जणींना प्राण गमावाव लागला.


- Advertisement -

हेही वाचा – बेळगावातील भीषण अपघातात ११ जण ठार


 

- Advertisement -