वाधवान बंधूंच्या अडचणीत वाढ; सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याप्रकरणी आठ दिवसांची सीबीआय कोठडी

सीबीआयने या प्रकरणातील चौकशीसाठी विशेष सीबीआय कोर्टाकडे 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती

dhfl scam case cbi special court extended the remand of wadhawan brothers

देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने डीएचएफएल कंपनीचे संचालक धीरज वाधवान आणि कपिल वाधवान बंधुंना अटक केली आहे. देशातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या सीबीआय कोर्टाने वाधवान बंधूंना आठ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हा 34 हजार कोटींचा घोटाळा आहे. या प्रकरणी यापूर्वी अटक केलेले आरोपी अजय रमेश यांनाही दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

सीबीआयच्या माहितीनुसार, धीरज वाधवन आणि कपिल वाधवन यांना लखनऊ तुरुंगातून दिल्लीला ट्रान्झिट रिमांडवर हजर करण्यात आले. दोघा भावांना एका दुसऱ्या प्रकरणात अटक केली होती, तेव्हापासून ते तुरुंगातच आहेत. दरम्यान सीबीआयने मंगळवारी दोघांना विशेष सीबीआय कोर्टात हजर केले, यावेळी कोर्टाने वाधवान बंधूनी केलेल्या 34 हजार कोटींच्या डीओएचएफएल बँक घोटाळ्या प्रकरणी चौकशी करणे गरजेचे असल्याचे युक्तीवाद सीबीआयने केला आहे. यावेळी कोर्टाने त्यांना आठ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा : वाधवाननंतर आता आमदाराच्या कुटुंबीयांचाही विशेष परवानगीने प्रवास!

सीबीआयकडून 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी

सीबीआयने या प्रकरणातील चौकशीसाठी विशेष सीबीआय कोर्टाकडे 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. यावेळी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर विशेष न्यायालयाने वाधवान बंधूंना आठ दिवसांची सीबीआय कोठडीची शिक्षा सुनावली आहे. याचबरोबर याप्रकरणातील अटकेतील आरोपी अजय रमेश याच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ केली आहे. गेल्या आठवड्यात मुंबईतील छापेमारीदरम्यान अजय रमेशला अटक करण्यात आली होती.

यावेळी सीबीआयने अजय रमेशकडील सुमारे 40 कोटी रुपयांच्या मुर्ती आणि पेंटिग्स याशिवाय महागडी घड्याळ जप्त केली आहे. हे सर्व सामान घोटाळ्यातील रकमेशी संबंधित असल्याचा संशय सीबीआयला आहे. त्यामुळे सीबीआयने वाधवान बंधू आणि अजय रमेश या तिघांना समोरासमोर बसवून चौकशी करणे गरजेचे असल्याचे विशेष सीबीआय कोर्टात सांगितले आहे.

हेही वाचा : वाधवान प्रकरणी शरद पवार यांचा हात; किरीट सोमय्या यांचा गंभीर आरोप

प्रकरण काय आहे?

डीएचएफएलचे संचालक कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्याविरोधात सरकारी अनुदान लाटल्याच्या आरोपाखाली सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. वाधवान बंधुंना मुंबईतील वांद्रा येथे डीएचएफएल बँकची बनावट शाखा खोलून त्यामाध्यमातून पंतप्रधान आवास योजनेत 14,046 कोटी रुपयांची बनावट कर्ज खाती तयार केली. मात्र ज्या ग्राहकांच्या नावाने खाती काढलीत त्या ग्राहकांनी आपले कर्ज आधीच भरले होते, या खात्यांनाही डेटाबेसमध्ये टाकले होते.

येस बँक आर्थिक घोटाळ्याप्रकरणी कपिल वाधवान आणि धीरज वाधवान आधीच तुरुंगात आहेत. आता त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून अवैधरित्या 1,887 कोटी रुपयांचे अनुदान मिळवत आणि त्यासाठी बनावट खाती तयार केल्याचा आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.


हेही वाचा : महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार; या राज्यांना मात्र हवामान विभागाचा इशारा