घरदेश-विदेशDhulivandan : देशभरात धुलिवंदनाचा उत्साह शिगेला, पंतप्रधानांनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा

Dhulivandan : देशभरात धुलिवंदनाचा उत्साह शिगेला, पंतप्रधानांनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा

Subscribe

भारतासह जगभरात धुलिवंदन सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यभरातही विविध ठिकाणी होळीनंतरच्या धुलिवंदन सणाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. होलिका दहन केल्यानंतर विविध रंगांनी धुलिवंदन सणाचा आनंद घेतला जातो. मात्र कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षात होळी या सणावर निर्बंध आले. त्यामुळे दोन वर्षे देशवासियांना होळी सणाचा आनंद घेता आला नाही. मात्र यंदा कोरोना संसर्ग आटोक्यात आल्याने महाराष्ट्रात अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे आज निर्बंधमुक्त धुलिवंदन सण साजरा करता येणार आहे. धुळवडीवर राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नाहीत मात्र गृहखात्याने काही मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत.

धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपणा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. परस्पर प्रेम, आपुलकी आणि बंधुभावाचे प्रतीक असलेल्या या रंगांच्या सणानिमित्त आपल्या आयुष्यातही आनंदाचा प्रत्येक रंग येवो. अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र यांनी देशवासियांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

साईबाबांच्या शिर्डीतही धुलिवंदनाचा उत्साह

साईबाबांच्या पवित्र शिर्डीतही हुतानशी पौर्णिमेचे औचित्य साधून होळीची विधीवत पूजा करण्यात आली. होलीकोत्सव मोठ्या उत्साहात तसेच भक्तीमय वातावरणात शिर्डीतील साईमंदिरात साजरा होणार आहे. मात्र रंगपंचमीला निघणारी साईबाबांच्या रथाची मिरवणूक यंदा स्थगित करण्यात आली आहे.

- Advertisement -

कोकणातही धुळवडीचा उत्साह शिगेला

कोकणातही होळी सणाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. रत्नागिरी, रायगड, लांजा, खेड अशा ठिकाणी होळीनिमित्त ग्राम देव-देवतांच्या पालख्या नाचवल्या जातात. तर तळ कोकणात अनेक भागांत होळीत सोंग आणि खेळी नाचवल्या, खेळल्या जात आहे. चाकरमानी देखील मोठ्या संख्येने आपल्या मूळगावी दाखल झाले आहेत. कोकणातील प्रत्येक गावात होळीच्या काही रूढी आणि परंपरा पाहायला मिळतात. अतिशय पारंपारिक सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी यावेळी पाहायला मिळतेय.

मथुरा आणि वृंदावनमध्ये होळीचा उत्साह

दरम्यान मथुरा आणि वृंदावनमध्येही होळीचा उत्साह पाहायला मिळतोय. यावर्षी होळीसाठी वृंदावन आणि मथुरेत नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मोठ्या धुमधडाक्यात होळी साजरी केली जात आहे. मथुरामधली फुलांची होळी ही जगभर प्रसिद्ध आहे. यावेळी गुलाब, कमळ, चंपा,चमेली या सारखी असंख्य फुलांनी होळी सण साजरा केला जातो. तसंच मथुरातील नंदबाबाच्या मंदिरातही होळी खेळली जाते.


Holi 2022 : रंगपंचमीला तुमच्या राशीनुसार वापरा ‘हे’ रंग; वाढेल यश, मिळेल किर्ती


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -