घरदेश-विदेशसावरकर समझा क्या...; काँग्रेसचं ‘ते’ ट्वीट व्हायरल!

सावरकर समझा क्या…; काँग्रेसचं ‘ते’ ट्वीट व्हायरल!

Subscribe

नवी दिल्ली : राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय पातळीवर मोदी सकरकारच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे भाजपाकडून राहुल गांधींच्या विधानावर टीका करताना राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे लोकसभेतही सलग पाच दिवस गदारोळ पाहायला मिळाला. मात्र काँग्रेसकडून राहुल गांधींच्या भूमिकेच समर्थन केल जात आहे. अशातच काँग्रेसने राहुल गांधींचा एक फोटो शेअर केला आहे, जो तुफान व्हायरल होत आहे.
राहुल गांधी परदेशातून परत आले असले तरी त्यांनी लंडन त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून भारतात राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचे विधान राहुल गांधींनी केले होते. त्यामुळे संसदेचा अपमान केल्याची टीका भाजपाकडून होत आहे.

राहुल गांधींच्या घरी पोलीस!
राहुल गांधी यांच्या घरी दिल्ली पोलीस दाखल झाल्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष सीपी (कायदा आणि सुव्यवस्था) सागर प्रीत हुड्डा हे राहुल गांधींच्या निवासस्थानी दुपारी पोहोचले आहेत. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमधील लैंगिक पीडितांबाबत वक्तव्य केले होते. त्या प्रकरणी राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी दिल्ली पोलीस त्यांच्या घरी पोहोचले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना नोटीस बजावून लैंगिक पीडितांची माहिती देण्यास सांगितले होते, मात्र अद्यापपर्यंत राहुल गांधींनी नोटीसला उत्तर दिलेले नाही.

- Advertisement -

काय आहे प्रकरण
राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान 30 जानेवारी रोजी श्रीनगरमध्ये आले होते. त्यावेळी येथे महिलांचे लैंगिक आणि शारीरिक शोषण होत असल्याच्या तक्रारी त्यांच्याकडे आल्या असल्याचे राहुल गांधींनी सांगितले होते. राहुल गांधींच्या या वक्तव्यावर नोटीस जारी करून दिल्ली पोलिसांनी त्यांना त्या सर्व महिलांची माहिती देण्यास सांगितले आहे. जेणेकरून त्यावर कारवाई करू शकू, असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करून त्या महिलांना न्याय मिळावा, हा आमचा हेतू असल्याचे सागर प्रीत हुड्डा यांनी सांगितलं.

 काँग्रेसचे ट्विट आणि पुन्हा वाद होण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या घरी आज पोलीस चौकशीसाठी गेले होते. असे असतानाही काँग्रेसचे एक ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या ट्वीटमध्ये काँग्रेसने राहुल गांधींचा कारमध्ये बसलेला एक फोटो शेअर करताना “सावरकर समझा क्या? नाम राहुल गांधी है”, असे ट्विट केले आहे. या ट्वीटवरून आता पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -