नवी दिल्ली : भारताकडून पाठविण्यात आलेल्या चांद्रयान-3 हे0 आंतरराळ पुढील काही तासांत चंद्राच्या दक्षिण ध्रृवार उतरणार आहे. सायंकाळी 6.04 वाजता हे यान लॅंड होणार असून, लॅंडींगचे ते पंधरा मिनीटे हे धोकादायक असणार आहे. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष आपल्या चंद्रमोहिमेकडे लागले असून, आजची सायंकाळ ही भारतवासीयांना अभिमानाची ठरणार आहे. एकीकडे हे जरी सुरू असले तरी चांद्रयान-3 मोहिमेला किती खर्च लागला असेल असा प्रश्न अनेकांना पडला असेल. मात्र, चांद्रयान-3 मोहिमेला लागलेला खर्च हा एका चित्रपटाच्या बजेटपेक्षाही कमी असून, केवळ 600 ते 6.15 कोटी रुपये एवढाच या मोहिमेसाठी खर्च आल्याची माहिती समोर आली आहे. (Did you know that Chandrayaan3 was sent at less than the budget of RRR and Avatar films!)
जगातील प्रगत देश चंद्रमोहिम सोडाच इतर ग्रहांवरही खूप मोठा खर्च करून जाऊ शकतात. मात्र, आपल्या देशाला यासाठी सर्वच गोष्टींचा विचार करावा लागतो. दरम्यान 14 जुलै रोजी इस्रोमधून प्रक्षेपीत झालेल्या या चांद्रयान-3 या मोहिमेसाठी भारताला जास्त खर्च आला असून, एका चित्रपटाच्या बजेटपेक्षाही कमी खर्चात ही मोहिम राबविण्यात आली आहे.
हेही वाचा : सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्मवर अश्लीलता रोखण्यासाठी नियम बनवणार? केंद्राने उच्च न्यायालयात काय म्हटले?
या चित्रपटांच्या बजेटपेक्षाही कमी खर्च
चांद्रयान-3 या मोहिमेसाठी भारताला 700 कोटी रुपये एवढा खर्च आला आहे. हा खर्च नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ओपनहायमर ( Oppenheimer) या चित्रपटाच्या बजेटपेक्षाही कमी आहे. Oppenheimer चित्रपटाचा बजेट हा 830 कोटी रुपये एवढा होता. तर दुसरा चित्रपट म्हणजे बार्बी (Barbie) हा तर चांद्रयान-3 मोहिमेच्या दुप्पट खर्चाचा चित्रपट आहे. या चित्रपटाचा बजेट हा 1200 कोटी रुपये एवढा होता. चांद्रयान-3 मोहिमेच्या खर्चाबाबत म्हणाल तर इस्रोने या मोहिमेसाठी सुरुवातील 600 कोटी रुपये एवढा खर्च निश्चित केला होता. मात्र 615 कोटी रुपये एवढा खर्च या मोहिमेसाठी अंतिम झाला. एकुणच आपल्याकडे जेवढ्या खर्चात एखादा चित्रपट तयार केल्या जातो अगदी त्याच्या तुलनेत कमी खर्चात आपली चांद्रयान-3 ही मोहिम पार पडण्याच्या मार्गावर आहे.
हेही वाचा : चांद्रयान-3 यशस्वी होणारच, पण ‘या’ व्यक्तीचा विसर पडता कामा नये; आर माधवनची पोस्ट चर्चेत
चांद्रयान-1 हे चीनच्या चंद्र मोहिमेपेक्षा अडीचपट होते स्वस्त
भारताच्या मागील दोन चंद्र मोहिमेवरील खर्चाबद्दल बोलायचे झाल्यास, चांद्रयान-1 हे चीनच्या चंद्र मोहिमेच्या तुलनेत अडीच पट स्वस्त होते. या मिशनवर एकूण 386 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. चांद्रयान-1 चे प्रक्षेपण 22 ऑक्टोबर 2008 रोजी झाले. 28 ऑगस्ट 2009 पर्यंत काम केले. चांद्रयान-१ ने चंद्रावर फक्त पाण्याचा पुरावा दिला. या दरम्यान चीनच्या चांग-ई-1 ची किंमत 180 दशलक्ष डॉलर्स होती.
चांद्रयान-2 ची किंमत अनेक हॉलिवूड चित्रपटांपेक्षा कमी
2019 मध्ये चांद्रयान-2 लाँच करण्यात आले होते. चांद्रयान-2 साठी आलेला खर्च हॉलिवूड चित्रपट अवतार आणि अॅडव्हेंचर्स एंडगेमपेक्षा (Adventures Endgame) कमी होती. या संपूर्ण मोहिमेचा खर्च 978 कोटी रुपये होता. मिशनसाठी 603 कोटी आणि प्रक्षेपणासाठी 375 कोटी खर्च आला. मात्र, हे मिशन अयशस्वी ठरले होते.