घरगणपती उत्सव बातम्याGanesh Chaturthi 2020: सर्वात मोठ्या मुस्लिम देशाच्या नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो!

Ganesh Chaturthi 2020: सर्वात मोठ्या मुस्लिम देशाच्या नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो!

Subscribe

आज संपूर्ण देशात गणेश चतुर्थी साजरी केली जात आहे. कोणत्याही कामाच्या सुरुवातील गणपती बाप्पाची पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते. गणपती बाप्पाची पूजा फक्त भारतात नाही तर संपूर्ण जगात केली जाते. गणपती विषयी अनेक तथ्य आहेत, पण सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे गणपती बाप्पाचे चित्र हे इंडोनेशियाच्या चलनावर होता. जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश हा इंडोनेशिया आहे. गणेश चतुर्थी निमित्ताने आज आपण इंडोनेशियाच्या चलनावर गणपती बाप्पाचा फोटो का आहे हे जाणून घेणार आहोत.

इंडोनेशिया आणि भारत या दोन्ही देशांमधील संस्कृतीत अनेक समानता आहेत. इथे गेल्यावर आपण भारतात असल्याचा गैरसमज होऊ शकतो. येथे अनेक हिंदू देवतांची पूजा केली जाते. मलेशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान हजारो बेटांवर पसरलेल्या इंडोनेशियात मुस्लिमांची सर्वाधिक लोकसंख्या आहे, परंतु येथे हिंदू धर्माचा प्रभाव असल्याचे दिसते.

- Advertisement -

गणपती बाप्पाला कला आणि बुद्धीचा देवता मानले जाते. यामुळे इंडोनेशियातील चलनावर गणपती बाप्पाचा फोटो होता. काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था कोलमडली होते. त्यानंतर तेथील अर्थशास्त्रज्ञांनी विचारविनिमय करून २० हजार रुपयांची नवीन नोट जारी केली. ज्यावर गणपती बाप्पाचा फोटो छापला होता. यानंतर जेव्हापासून नोटेवर गणपतीचा फोटो छापण्यात आला तेव्हापासून देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली, असे इथल्या लोकांचे म्हणणे होते. पण वास्तविक १९९८ नंतर इंडोनेशियात २० हजार रुपयांची नवीन नोट आली. १९९८ साली आलेल्या या नव्या नोटीवर गणपती बाप्पा फोटो काढण्यात आला.

- Advertisement -

हेही वाचा – Ganesh Chaturthi 2020: PM Modi यांनी गणेश चतुर्थीच्या दिल्या शुभेच्छा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -