घरदेश-विदेशसोमय्यांनी विनाकरण संघर्ष वाढवण्याचे काम करायला नको होते; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

सोमय्यांनी विनाकरण संघर्ष वाढवण्याचे काम करायला नको होते; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Subscribe

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपने पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप करत या घटनेसाठी आता मुंबई पोलिसांना जबाबदार धरले आहे. या आरोपांना आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

खर तर सोमय्यांना पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नव्हती. कारण ज्यावेळी कोणतीही व्यक्ती कस्टडीमध्ये असते. त्यावेळी कस्टडीतील व्यक्तीला फक्त वकील आणि त्याचे नातेवाईकांना भेटण्यास परवानगी असते. त्यामुळे तिथे जाऊन विनाकरण संघर्ष वाढवण्याचे काम सोमय्यांनी करायला नको होते, मात्र झालं जे ते चांगलं नाही झालं. असं दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत.

- Advertisement -

या घटनेवरून आता भाजपकडून पोलिसांच्या निलंबनाची मागणी होत आहेय. मात्र गृहमंत्र्यांनी ही मागणी फेटाळून लावत, नियमाप्रमाणे जे असेल ते होईल असे म्हणाले आहेत.

नेत्यांना मिळणाऱ्या झेड प्लस सिक्युरिटीवर प्रश्न उपस्थित करत वळसे पाटील म्हणाले की, या व्यक्तींना कोणत्या कारणासाठी झेड प्लस सिक्युरिटी दिली जाते. त्यांना कोणापासून धोका आहे. त्यांच असं काय कृत्य आहे की त्यांना सुरक्षा दिली जातेय.

- Advertisement -

राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहेत. पण पोलीस सक्षम आहेत. राणा यांनी केलेल्या कृतीनुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच काही चूक नाही असं वळसे पाटील म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या आंदोलकांवर जसे गुन्हे दाखल झाले तसेच गुन्हे माझ्या घरावर हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर दाखल करण्याची मागणी राणा दाम्पत्यांनी केली होती. त्यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले की, गुन्हे दाखल झाले आहेत, असे सांगितले आहे.

राज्यातील आघाडी सरकारला सत्तेत आल्यापासून सतत काही ना काही सुरु आहे. हे सरकार सत्तेत राहिले नाही पाहिजे यासाठी ज्या क्लृपत्या करायच्या त्या केल्या जात आहेत. हा त्याचाच एक भाग आहे. राण दाम्पत्याच्या कृती मागे कुणाचा तरी हात आहे. याशिवाय एवढं धाडस ते करुच शकणार नाहीत. असे देखील वळसे पाटील म्हणाले.


INS विक्रांत घोटाळा विचलित करणारा, जनतेनं दोन दगड मारले तर वाईट काय? राऊतांचा सोमय्यांवर हल्लाबोल 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -