दिनेश गुणवर्धने श्रीलंकेचे नवे पंतप्रधान

श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होतेय

dinesh gunawardena appointed as the prime minster of sri lanka

श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी ज्येष्ठ राजकीय नेते दिनेश गुणवर्धने विराजमान झाले झाले आहे. त्यांनी आज कोलंबोमधील फ्लॉवर रोडवरील पंतप्रधान कार्यालयात पंतप्रधान पदाची शपथ घेतली. तर रानिल विक्रमसिंघे यांनी राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकरला आहे. दरम्यान आज दिनेश गुणवर्धने यांनी श्रीलंकेच्या पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली आहे.

श्रीलंकेच्या राजकारणातील एक अनुभव व्यक्ती म्हणून गुणवर्धने यांच्याकडे पाहिले जाते. यापूर्वी एप्रिलमध्ये श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांच्या कार्यकाळात गुणवर्धने यांना गृहमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तसेच त्यांनी परराष्ट्र मंत्री आणि शिक्षण मंत्री म्हणून देखील कार्यभार सांभाळला आहे. मात्र विक्रमसिंघे यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्याने श्रीलंकेचे पंतप्रधान पद रिक्त होते. त्यानंतर आता दिनश गुणवर्धने यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे.

हेही वाचा: sri lanka crisis : आर्थिक संकटात श्रीलंका सरकार छापणार नवे चलन; कर्ज फेडीसाठी विकणार विमान कंपन्या

गोतबाया राजपक्षे यांनी श्रीलंका सोडून पलायन केल्यानंतर 73 वर्षीय रानिल विक्रमसिंघे यांनी गुरुवारी देशाचे आठवे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली, त्यामुळे पंतप्रधान पद रिक्त होते. आता दिनेश गुणवर्धने यांची पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे.

श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होतेय, या आर्थिक संकटातून श्रीलंकेला बाहेर पडण्यासाठी आता मार्ग सापडेनासा झाला आहे. यात देशात इंधनासह जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. 22 दशलक्ष लोकसंख्येच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी पुढील महिन्यांत देशाला सुमारे पाच अब्ज डॉलर्सची गरज आहे.


हेही वाचा : सुरक्षा दलांनी राष्ट्रपतींच्या सचिवालयातून आंदोलकांना हुसकावलं, ५० जण जखमी; ९ जणांना अटक