घरताज्या घडामोडीकर्नाटक मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये तीन नावांची चर्चा, जाणून घ्या

कर्नाटक मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये तीन नावांची चर्चा, जाणून घ्या

Subscribe

कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री लिंगायत समाजाचा नको असे बी एस येडियुरप्पा यांनी भाजप पक्ष श्रेष्ठींकडे म्हटलं आहे.

बीएस येडीयुरप्पा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री झाल्यावर २ वर्षांच्या कार्यकाळात राजीनामा दिला आहे. येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिल्यामुळे कर्नाटकटमधील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणा आलं आहे. तरा आता कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री कोण यावर चर्चा सुरु झाली आहे. भाजप पक्षश्रेष्ठी आता नवा मुख्यमंत्री म्हणून कोणाचे नाव जाहीर करतायत याकडे कर्नाटकमधील जनतेचे आणि राजकीय मंडळींचे लक्ष लागले आहे. दरम्यान मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये ३ नावांची चर्चा आहे. परंतू लिंगायत समाजाचा मुख्यमंत्री करावा यासाठी आरएसएसने आग्रही भूमिका घेतली असल्याचे समजते आहे.

बीएस येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाा राजीनामा दिल्यामुळे आता नवा मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी बसवराज बोम्मई, विश्वेश्वरा हेगडे कगेरी आणि केंद्रीय मंत्री कोळसा खणन मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी ही ३ नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असून बरीच चर्चेत आहेत. येडीयुरप्पा यांच्यानंतर लिंगायत समजाचा मुख्यमंत्री करण्यासाठी आरएसएस आग्रही आहे. बोम्मई हे लिंगायत समाजाचे आहेत. बसवराज बोम्मई यांच्याकडे कर्नाटक गृहमंत्री पदावर आहेत. तर विश्वेश्वर हेगडे हे कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष आहेत. ते ब्राम्हण सामाजाचे आहेत तर प्रल्हाद जोशी हे संसदीय कार्यमंत्री आहेत.

- Advertisement -

कर्नाटकमध्ये खांदेपालट होणार याची कुरबूर काही दिवस अगोदरच सुरु झाली होती. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा पदावरुन पायउतार होणार असल्याची चर्चांना उधाण आलं होतं. मात्र येडियुरप्पा यांनी स्पष्टोक्ती दिली नव्हती अखेर कर्नाटक भाजप सरकारला २ वर्षांचा कालावधी पुर्ण झाल्यावर सोमवारी येडियुरप्पा यांनी राज्यपाल यांच्याकडे आपला राजीनामा दिला आहे. यामुळे आता नवे मुख्यमंत्री कोण अशी चर्चा रंगू लागली आहे. भाजप पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावाची घोषणा करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

लिंगायत समुदायाचा मुख्यमंत्री नको

कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री लिंगायत समाजाचा नको असे बी एस येडियुरप्पा यांनी भाजप पक्ष श्रेष्ठींकडे म्हटलं आहे. राजीनामा देण्यापुर्वी येडियुरप्पा यांनी काही अटी ठेवल्या असून त्या पक्षश्रेष्ठींनी मान्य केल्या असल्याचे म्हटलं आहे. येडियुरप्पा स्वतः लिंगायत समुदायातून येतात तसेच भाजप कर्नाटक प्रदेशाध्यक्षही लिंगायत समुदायाचे आहेत यामुळे आता पुन्हा मुख्यमंत्री लिंगायत समुदायाचा नको असे मत बी.एस येडीयुरप्पा यांनी मांडले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -