Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Corona Vaccination: भारतात कोरोनाविरोधी मुकाबल्यासाठी लवकरच येणार चौथी लस, Pfizer - भारत...

Corona Vaccination: भारतात कोरोनाविरोधी मुकाबल्यासाठी लवकरच येणार चौथी लस, Pfizer – भारत सरकारमध्ये चर्चेला सुरुवात

Related Story

- Advertisement -

देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. कोरोनाबाधितांच्या आकड्याप्रमाणे कोरोना मृत्यूचा आकडा देखील झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सध्या लसीकरणावर अधिक भर देण्यात आला असून देशात आता सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लसीचे डोस दिले जात आहेत. मागच्या महिन्यात रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीला ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिली. आता रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लसीचा पहिला साठा मेच्या अखेरीस येण्याची शक्यता आहे. दरम्यान देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढण्यासाठी आणखीन एक लस तयार असून लवकरच येणार असल्याचे समोर आले आहे.

फायझर बायोएनटेकची लस भारतात लवकरच उपलब्ध व्हावी यासाठी कंपनी भारत सरकारशी चर्चा करीत आहे, जेणेकरून लसीला जलद मंजूरी मिळू शकेल, असे जागतिक औषधनिर्माण संस्था फायझरचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बूर्ला आज म्हणाले. फायझरने यापूर्वी एप्रिलमध्ये सांगितले होते ती, भारतातील लसीकरण मोहीम कार्यक्रमासाठी आपली लस फायदेशीर दरात उपलब्ध करून देण्याची ऑफर दिली आहे आणि भारतात कोरोना लस उपलब्ध करण्यासाठी सरकारसोबत एकत्र मिळून काम करण्यास वचनबब्ध केले होते.

- Advertisement -

बुर्ला पुढे म्हणाले की, फायझरला याची जाणीव आहे की, कोरोना माहामारीचा नाश करण्यासाठी लसीची उपलब्धता महत्त्वपूर्ण आहे. दुर्दैवाने आपली लस भारतात नोंदणीकृत नाही, तरी आम्ही काही महिन्यांपूर्वी निवेदन दिले होते. पण सध्या आम्ही फायझर बायोएनटेकची लस भारतात उपलब्ध करून देण्यासाठी त्वरित मंजूर करण्यासाठी सरकारशी चर्चा करीत आहोत.

कंपनीने सांगितले की, कंपनी देशात सरकारच्या लसीकरण मोहीमेत फायझर आणि बायोएनटेक लस देण्यास वचनबद्ध आहे. दरम्यान गेल्या महिन्यात भारत सरकारने आयात केलेल्या लसींच्या आपात्कालीन वापरास परवानगी दिली.


- Advertisement -

हेही वाचा – Covid-19 Vaccine घेतल्यानंतर धुम्रपान करताय? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत


 

- Advertisement -