घरदेश-विदेशसावधान! Kinder Joy खाल्ल्याने मुलं पडताहेत आजारी, पसरतोय 'हा' रोग

सावधान! Kinder Joy खाल्ल्याने मुलं पडताहेत आजारी, पसरतोय ‘हा’ रोग

Subscribe

लहान मुलांना चॉकलेट खूप आवडीचे आहे. यात काही ब्रँड्सची चॉकलेटं मुलं अधिक आवडीने खातात. यातील एक ब्रँड म्हणजे किंडर जॉय. जगभरात मुलांमध्ये किंगर जॉयचे चॉकलेट्स आणि प्रोडक्ट्स खूप लोकप्रिय आहेत. मात्र किंडर जॉय प्रोडक्ट्स बद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. किंडर जॉय हे प्रोडक्ट्स बनवणाऱ्या फेरेरो या कंपनीने आपले एखादे उत्पादन आरोग्यासाठी सुरक्षित न वाटल्यास ते बाजारातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

खरं तर इंग्लंडच्या फूड सेफ्टी एजन्सीने (FSA) ग्राहकांना विशिष्ट किंडर जॉय ब्रँडचे प्रोडक्ट्स वापरणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान युरोपातील अन्न सुरक्षा यंत्रणेला किंडर जॉयची खाद्य उत्पादने आणि साल्मोने या विषाणूजन्य संसर्गाचा प्रसार यांच्यातील संबंध असल्याचा संशय आहे.

- Advertisement -

इंग्लंडच्या अन्न सुरक्षा एजन्सी एफएसएकडून अलर्ट जारी

UKHSA आणि युरोपमधील इतर काही आरोग्य एजन्सींनी केलेल्या तपासणीत कंपनीची उत्पादने आणि यूकेमध्ये पसरणारे साल्मोनेला संसर्ग यांच्यातील संबंध आढळला आहे. या संदर्भात फेरेरो कंपनीने खबरदारी म्हणून आपले उत्पादन मागे घेतले आणि तपास सुरू केला. परत मागवलेले उत्पादन त्याच कारखान्यात तयार केले जाते, पण बाकीच्या किंडर जॉयच्या उत्पादनांवर सध्या याचा परिणाम झालेला नाही.

फेरेरो कंपनीने दिले हे स्पष्टीकरण

किंडर जॉय उत्पादन निर्माता फेरेरोने आपले उत्पादन मागे घेण्याची घोषणा केली आहे. सॅल्मोनेला संसर्ग होण्याच्या शक्यतेमुळे कंपनीने आपल्या उत्पादन किंडर सरप्राईजच्या काही बॅच परत मागवत असल्याचे म्हटले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, 11 जुलै 2022 ते 7 ऑक्टोबर 2022 दरम्यान बेस्ट बिफोर डेट असलेले किंडर सरप्राईजचे 20 ग्रॅमचे पॅकेट फक्त मागे घेतले जात आहे.

- Advertisement -

आपण उत्पादन खरेदी केले असल्यास काय करावे?

किंडर सरप्राईजबाबत कंपनीने सांगितले आहे की, जर तुम्ही उत्पादन घेतले असेल तर तुम्ही ते खाऊ नका. याबद्दल फेरेरो कंझ्युमर केअरलाइनशी संपर्क साधून तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता. तसेच लोकांना माहिती देण्यासाठी किरकोळ स्टोअरमध्ये उत्पादनाविषयी नोटीस लावल्या जातील. उत्पादने का परत मागवली जात आहेत हे या नोटिसांमध्ये स्पष्ट केले जाईल. तुम्ही ही उत्पादने खरेदी केली असल्यास पुढे काय करावे हे देखील तुम्हाला सांगितले जाईल.

साल्मोनेला रोखायचा कसा?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, साल्मोनेला संसर्ग कच्चे मांस, पाश्चर न केलेले दूध, अंडी, गोमांस किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तूंमधून पसरतो. याशिवाय दूषित पाणी किंवा अन्न खाल्ल्याने देखील तुम्हाला या जीवाणूचा संसर्ग होऊ शकतो.

हे जीवाणू लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी अधिक धोकादायक ठरू शकतात. त्याचा संसर्ग साधारणपणे 4 ते 7 दिवस टिकतो. लक्षणांबद्दल बोलायचे झाले तर त्यात पोटदुखी, मळमळ, उलट्या, जुलाब, ताप, थंडी वाजून येणे, डोकेदुखी, स्टूलमध्ये रक्त येणे यांचा समावेश होतो.


स्वामित्व योजनेअंतर्गत देशातील जवळपास ३१ हजार गावांमध्ये मालमत्ता पत्र तयार, योजना २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -