घरदेश-विदेशमिशन अयोध्या: शिवसेनेच्या नेत्यांमध्ये कामांची चढाओढ

मिशन अयोध्या: शिवसेनेच्या नेत्यांमध्ये कामांची चढाओढ

Subscribe

अयोध्येत जाहीर सभा घ्यावी की नाही? सभा घेतली तर परवानग्या लागतील. परवानगी मिळाली तर सभेला गर्दी जमवावी लागेल... अशा अनेक मुद्द्यांवर सध्या शिवसेनेच्या नेत्यांमधला विसंवाद पाहायला मिळत आहे. तरिही उद्धव ठाकरे यांना दाखवण्यासाठी सेनेच्या नेत्यांमध्ये दौरा यशस्वी करण्याची चढाओढ लागली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्यात अयोध्याला जाऊन भव्य सभा घेणार अशी राणा भीमदेवी थाटात घोषणा केली. मात्र २५ नोव्हेंबरला प्रास्ताविक जाहीर सभा होणार का? यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जाहीर सभा घेण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या अजून मिळालेल्या नसताना मिशन अयोध्या यशस्वी करण्यासाठी मात्र शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चढाओढ लागल्याची पाहायला मिळत आहे.

उद्धव ठाकरेंनी अयोध्येत सभा न घेता फक्त मंदिराला भेट देऊन महत्त्वाच्या पुजाऱ्यांची भेट घ्यावी, असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. तर अयोध्येत जाहीर सभा व्हायलाच पाहीजे, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांनाच या कामची देखरेख करण्यासाठी अयोध्येत पाठवले आहे.

- Advertisement -
हे वाचा – उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा चौकशीच्या फेर्‍यात

नार्वेकरांचा नेहले पे देहला

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपुर्ण अयोध्या दौऱ्याची जबाबदारी सामनाचे संपादक खासदार संजय राऊत यांच्यावर टाकलेली आहे. मागच्या एक महिन्यापासून ते उत्तर प्रदेशचे दौरे करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली होती. मात्र जाहीर सभेसाठी परवानग्या मिळवण्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळेच उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार मिलिंद नार्वेकर यांनी अयोध्या गाठत काल (दि. १९ नोव्हेंबर) थेट राज्यपाल राम नाईक यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संबंधित परवानग्या द्याव्यात, अशी विनंती नार्वेकर आणि राऊत यांनी केली असल्याचे कळते. आज (२० नोव्हेंबर) सकाळी दहा वाजता दोन्ही नेते योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन परवानग्या मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

नेत्यांमध्येच जुंपली ‘मी मी’ ची स्पर्धा

जाहीर सभेला गर्दी जमवण्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुखांनी ठाण्याचे नेते एकनाथ शिंदे तर मुंबईतल्या काही नेत्यांवर सोपवली आहे. आम्ही गर्दी जमवू पण जाहीर सभा घ्याच, असा सल्ला शिंदे देत आहेत. तर खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत, आमदार अॅड. अनिल परब हे देखील आपापल्यापरिने आम्ही दौऱ्यासाठी काय काय करतोय? हे दाखविण्याची धडपड करत आहेत. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी देखील उत्तर प्रदेश प्रशासनाला पत्र लिहून जाहीर सभेसाठी परवानग्या मिळण्याची विनंती केली आहे.

- Advertisement -

सध्या राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, अनिल परब आणि इतर आमदार अधिवेशनात व्यस्त आहेत. याचाच फायदा उचलत आम्हीच कसे अयोध्यात सभा यशस्वी करण्यासाठी झटत आहोत, हे दाखवण्यासाठी संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांची धडपड चालल्याची दिसून येत आहे.

असा असेल उद्धव ठाकरेंचा दौरा

उद्धव ठाकरेंच्या वेळापत्रकानुसार २४ नोव्हेंबर रोजी शरयू नदीकिनारी संध्याकाळी ५.१५ वाजता ते आरती करतील. त्याआधी लक्ष्मन किला येथे ते काही पुजाऱ्यांना भेटणार आहेत. २५ नोव्हेंबरला ते रामजन्मभुमीला भेट देऊन आधी पत्रकार परिषद घेतील आणि त्यानंतर दुपारी १ वाजता जाहीर सभा घेतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -