(Divorce case) कोलकाता : मुलीच्या कुटुंबीयांनी तसेच मित्रमैत्रिणींनी तिच्या सासुरवाडी तळ ठोकून राहणे, हेही क्रूरताच आहे, असे निरीक्षण नोंदवत कलकत्ता उच्च न्यायालयाने एका पतीला घटस्फोट मंजूर केला. लग्न होऊन अवघी तीन वर्षे झालेली असतानाच पतीने 2008मध्ये घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने हा निर्णय दिला. (Calcutta High Court observes that it is cruelty for wife’s family to stay at husband’s house for a long time)
लग्नानंतर सासरी गेलेल्या मुलीचा छळ सुरू होतो आणि त्याची परिणती साधारणपणे घटस्फोटात होते, असे एक सर्वसाधारण चित्र आहे. मात्र, अलीकडेच एआय अभियंता अतुल सुभाष यांनी पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांच्या छळाला कंटाळून कलेल्या आत्महत्येनंतर पतीवरही होणाऱ्या अन्यायाबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर कलकत्ता उच्च न्यायालयाचा हा निर्णय समोर आला आहे.
हेही वाचा – Ajit Pawar : कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी…; बीड प्रकरणी अजित पवारांनी दिला शब्द
पश्चिम बंगालमधील नबद्वीप हा विवाहसोहळा झाला होता. पती कोलाघाट येथे नोकरी करत असल्याने 2006मध्ये दोघेही कोलाघाट येथे राहायला गेले. 2008मध्ये पत्नी कोलकाता येथील नरकेलडांगा येथे राहण्यासाठी गेली. कारण ती सियालदह येथे काम करत होती, त्या ठिकाणापासून नरकेलडंगा जवळ असल्याने तिथे राहणे अधिक सोयीचे आहे, असे तिचे म्हणणे होते. तथापि, आपण असहाय्य झाल्याने पतीपासून दूर राहायला गेलो, असा दावा तिने चौकशीदरम्यान केला.
विशेष म्हणजे, पत्नीने 2008मध्ये पतीचे कोलाघाट येथील घर सोडल्यानंतरही तिचे कुटुंबीय आणि एक मित्र तिथेच मुक्कामाला राहिले. 2016मध्ये पत्नी उत्तरपाडा येथे राहण्यासाठी गेली. पत्नीने आपल्यापासून दूर राहणे ही क्रूरता आहे, असे पतीचे म्हणणे होते. शिवाय, पत्नीला कोणत्याही प्रकारचे नातेसंबंध किंवा मुले होण्यात स्वारस्य नसल्याचा दावाही त्याने केला. यावर निकाल देताना न्यायालय म्हणाले की, पत्नीच्या मित्रांनी किंवा नातेवाइकांनी पतीच्या इच्छेविरुद्ध घरी दीर्घकाळ मुक्कामी राहणे ही क्रूरता आहे. अनेक वेळा, पत्नी घरी नसताना, नातेवाईकांच्या उपस्थितीचा अपीलकर्त्याच्या जीवनावर खोलवर परिणाम झाला असावा, अशी टिप्पणीही न्यायालयाने केली. (Divorce case: Calcutta High Court observes that it is cruelty for wife’s family to stay at husband’s house for a long time)
हेही वाचा – SS UBT about EVM : ईव्हीएम घोटाळ्यावर मोदी सरकारकडूनच शिक्कामोर्तब, ठाकरे गटाचा थेट आरोप