Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश दिल्लीत यंदाही दिवाळी फटाक्यांविनाच, प्रदुषण रोखण्यासाठी केजरीवाल सरकारचा निर्णय

दिल्लीत यंदाही दिवाळी फटाक्यांविनाच, प्रदुषण रोखण्यासाठी केजरीवाल सरकारचा निर्णय

Related Story

- Advertisement -

दिल्लीत दिवसेंदिवस वाढते जीवघेणे प्रदुषण रोखण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीत फटाक्यांवर बंद घालण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून दिल्लीतील नागरिकांनी प्रदुषणाच्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागतोय. अशातच दिवाळी सणादरम्यान होणाऱ्या फटाक्यांच्या आचषबाजीमुळे केजरीवाल सरकारने यंदाही फटाक्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षी देखील दिल्लीत फटाक्यांची विक्री, साठा आणि वापरावर बंदी घातली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करत यासंदर्भातील माहिती जाहीर केली आहे.


मुख्य़मंत्री केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हंटले की, गेल्या तीन वर्षांपासून दिवाळीच्या काळात दिल्लीत प्रदुषणाची धोकादायक स्थिती निर्माण होते. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सर्व प्रकारच्या फटाक्यांची विक्री, साठा आणि वापर करण्यावर पूर्ण बंदी घातली आहे. जेणेकरुन लोकांचे जीव वाचवता येतील.

- Advertisement -

तर केजरीवाल यांनी फटाक्यांचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांना आवाहन केले की, , गेल्या वर्षी व्यापाऱ्यांकडून फटाक्यांच्या साठ्यानंतर प्रदुषणाचे गांभीर्य पाहून बंदी घातली. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झालं होतं. त्यामुळे आता सर्व व्यापाऱ्यांना आवाहन आहे की, राज्यात फटाक्यांवर पूर्ण बंदी असल्यानं कोणत्याही प्रकारे साठा करू नये.

पंजाब आणि हरयाणामधील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतातील टाकाऊ तण जाळून टाकतात. त्यामुळे या दोन्ही राज्यांमध्ये वायू प्रदुषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. दिल्लीत गेल्या दोन महिन्यात तर प्रदुषणाच्या पातळीनं उच्चांक गाठला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गवत जाळणे आणि प्रदूषणाबाबत पत्रकार परिषद घेत गवत जाळण्याऐवजी बायो डीकम्पोझरच्या वापरावर भर द्या असा सल्ला दिला.


ओवेसी भाजपाचा ‘चाचाजान’; राकेश टिकैतांनी लगावला टोला


- Advertisement -

 

- Advertisement -