Diwali 2022 : राष्ट्रपती मुर्मूं, पंतप्रधान मोदींसह ‘या’ दिग्गजांनी दिल्या देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा

diwali 2022 President Murmu, pm Modi along with these veterans wishes everyone a bright and prosperous Happy Diwali

देशभरात दिवाळी सण मोठ्या आनंदात, उत्साहात साजरा होत आहे. भारतीय संस्कृतील सर्वात मोठ्या सणांपैकी एक असलेल्या दिवाळी सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. आज दिवाळीचा पहिला दिवस धनोत्रयादशीचा आहे. याच दिनानिमित्त देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जनदीप धनखर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्विट करत सर्व देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रकाश आणि आनंदाच्या या पवित्र सणानिमित्त ज्ञानाचा आणि ऊर्जेचा दीप प्रज्वलित करुन गरजूंच्या जीवनात आनंद आणण्याचा प्रयत्न करुया, या महापर्वनिमित्त मी सर्व देशवासियांच्या जीवनात सुख, समृद्धी येवो अशी प्रार्थना करते.

उपराष्ट्रपतींनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनीही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट केले की, “तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! तेजस्वी प्रकाशाचा हा सण आपल्या जीवनात बुद्धी, मंगल आणि समृद्धी घेऊन येवो. झगमगत्या दिव्यांची आभा आपल्या देशाला आशा, आनंद, आरोग्य आणि सौहार्दाने उजळून टाकू दे.

पंतप्रधान मोदींनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

पीएम मोदींनी ट्विट केले की, ‘सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. दिवाळीचा संबंध प्रकाश आणि आनंदाशी आहे. हा पवित्र सण आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा भाव घेऊन जावो. मला आशा आहे की कुटुंब आणि मित्रांसोबत तुमची दिवाळी आनंदात जावो.’

गृहमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट केले की, ‘सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रकाशाचा हा सण सर्वांच्या आयुष्यात सुख, आरोग्य आणि भरभराट घेऊन येवो.

त्याचवेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करत म्हटलं की, ‘दीपावलीच्या पवित्र सणानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा! हा पवित्र सण तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. दीपावलीच्या शुभेच्छा!’


ब्रिटनचे बोरिस जॉन्सन पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर, ऋषी सुनक विजयाच्या दिशेने