गांधीनगर : गुजरातमध्ये आज चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दिवाळी आणि छठ पूजेसाठी अनेक परराज्यातील लोकांनी सूरत स्टेशनवर मोठी गर्दी केली होती. यावेळीच चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनास्थळी पोलीस रवाना झाले आहे.
सुरतच्या खासदार आणि केंद्र सरकारमधील रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. या घटनेवर पोलीस अधीक्षक (पश्चिम रेल्वे) सरजो कुमारी म्हणाले, सकाळी सुरत रेल्वे स्थानकावरून ताप्ती गंगा एक्सप्रेस ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली. तेव्हा प्रवाशांमध्ये गोंधळ झाला आणि काही लोक बेशुद्ध झाले. रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी झाल्याने काही प्रवाशांना अस्वस्थता आणि चक्कर आली”, अशी माहिती त्यांनी दिली.
एसएमआयएमईआर रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी जयेश पटेल म्हणाले, ‘गर्दीमुळे एक व्यक्ती कोसळला आणि त्याला मृत घोषित करण्यात आले. त्या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल. अन्य दोन प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास होत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा – मुंब्य्रात ठाकरे-शिंदे गट आमनेसामने; 500 पोलीस, आरपीएफसह दंगल नियंत्रण पथक तैनात
लवकरच सूरत स्टेशनला भेट देणार – हर्ष संघवी
सूरतच्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर गृह राज्यमंत्री हर्ष संघवी म्हणाले, बिहारकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची संख्या अचानक वाढल्यानंतर पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. सूरत रेल्वे स्टेशनला लवकरच भेट देणार आहे, अशी माहिती हर्ष संघवीने माध्यमांशी बोलातना दिली.
हेही वाचा – भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण, पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित गाण्याला ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये नामांकन
पश्चिम रेल्वेच्या 400 फेऱ्यांसह 46 विशेष गाड्या
पश्चिम रेल्वे सांगितले, सणासुदीच्या निमित्ताने पश्चिम रेल्वे मुंबई, गुजरात आणि मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये जवळपासून 400 फेऱ्यांसह 46 विशेष गाड्या सोडल्या आहेत. यात सात लाखांहून अधिक प्रवासी याचा लाभ घेत आहे. सुरत रेल्वे स्थानकावर जवळपास 165 आरपीएफ आणि जीआरपीचे जवान तैनात करण्यात आले आहे.