कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैयाच? डी.के. शिवकुमार यांचे संकेत; म्हणाले…

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा बहुमताने विजय झाला. काँग्रेसने कर्नाटकातील 135 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे सत्तेवर असलेल्या भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. या विजयानंतर आता कर्नाटकातील मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा रंगली आहे.

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा बहुमताने विजय झाला. काँग्रेसने कर्नाटकातील 135 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे सत्तेवर असलेल्या भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. या विजयानंतर आता कर्नाटकातील मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैयाच होणार याचे संकेतही शिवकुमार यांनी अप्रत्यक्षपणे दिले आहेत. (Dk Shivakumar Hint Siddaramaiah Will Become The Chief Minister Of Karnataka)

माजी मुख्यमंत्री सिद्धरमैया, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार ही दोन्ही नावं मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ मानली जात आहेत. तसेच, डी. के. शिवकुमार आणि सिद्धरमैया यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून तणावाचे संबंध असल्याची चर्चा आहे. अशातच डी के शिवकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नेमके काय म्हणाले डी के शिवकुमार?

“काही लोक म्हणतात की, माझे सिद्धरमैया यांच्याशी मतभेद आहेत. पण मला हे स्पष्ट करायचे आहे की आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. मी पक्षासाठी अनेक त्याग केले आहेत आणि सिद्धरमैया यांच्या पाठीशी उभा राहिलो आहे. मी सिद्धरमैया यांना पाठिंबा दिला आहे”, अशी प्रतिक्रिया शिवकुमार यांनी दिली.

डी. के. शिवकुमार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. कारण कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैयाच होणार याचे संकेतही शिवकुमार यांनी अप्रत्यक्षपणे दिले आहेत. कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. यात काँग्रेसने भाजपचा सुपडा साफ केला आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 113 हा बहुमताचा आकडा आहे.


हेही वाचा – ‘EVM हा घोटाळाचं आहे…’ कर्नाटकातील भाजपाच्या पराभवावर आव्हाडांची प्रतिक्रिया