Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश 'इतरांना त्रास होईल, असं वागू नका'; कुस्तीपटूंच्या आंदोलनावर मोदी सरकारची प्रतिक्रिया

‘इतरांना त्रास होईल, असं वागू नका’; कुस्तीपटूंच्या आंदोलनावर मोदी सरकारची प्रतिक्रिया

Subscribe

भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून कुस्तीपटू दिल्लीत आंदोलन करत आहेत. कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन सुरु केलं होतं.

भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून कुस्तीपटू दिल्लीत आंदोलन करत आहेत. कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलन सुरु केलं होतं. परंतु आता दिल्ली पोलिसांनी त्यांना आंदोलनस्थळावरुन हटवलं आहे. त्यानंतर कुस्तीपटूंनी देशासाठी जिंकलेली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कुस्तीपटूंनी हा निर्णय मागे घेत मोदी सरकारला पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर आता क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर चांगलंच फटकारलं आहे.(  Do not act in such a way that others will suffer Modi government Anurag Thakur s reaction to the wrestlers agitation )

खेळाडूंनी काय प्रश्न उपस्थित केला आहे, याची निष्पक्ष चौकशी व्हावी. चौकशीनंतर कारवाई व्हावी. पोलीस तपास करत आहेत. त्यांनी तपास पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा करावी, अशी आमचीही इच्छा आहे, असं अनुराग ठाकूर म्हणाले. तसेच, आगामी काळात महत्त्वाचे सामने होणार आहेत. आम्ही सर्व खेळाडूंसोबत आहोत. इतर खेळाडू आणि खेळांचे नुकसान होईल, असं कोणतेही पाऊल उचलू नये, असे आवाहन अनुराग ठाकूर यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना केले.

- Advertisement -

बृजभूषण शरण सिंह आणि कुस्तीपटूंमधील वाद थांबवण्याऐवजी वाढतच चालला आहे. कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्या अटकेची मागणी आंदोलक एक महिन्याहून अधिक काळापासून करत आहेत. दुसरीकडे भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण हे याप्रकरणात स्वत:ला निर्दोष सांगत आहेत. आपल्यावरील आरोप सिद्ध झाल्यास फाशी घेईन, असं त्यांनी सांगितलं आहे.

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना बृजभूषण म्हणाले की, माझ्यावर एकही आरोप सिद्ध झाला तर मी स्वत:ला फाशी देईन. आंदोलक कुस्तीपटूंकडे माझ्याविरुद्ध काही पुरावे असतील तर त्यांनी ते न्यायालयात सादर करावेत. मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे, विशेष म्हणजे बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेवर कुस्तीपटू ठाम आहेत.

- Advertisement -

( हेही वाचा: अमेरिकेत राहुल गांधींसमोर खलिस्तानी घोषणा; भारत, काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी )

शुक्रवारी, 27 मे रोजी साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटू त्यांच्या पदकांचे विसर्जन करण्यासाठी त्यांच्या समर्थकांसह हरिद्वार येथे पोहोचले होते. मात्र, शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी कुस्तीपटूंना वाटेत अडवून समज दिली. यानंतर कुस्तीपटूंनी आपलं पदक नरेश टिकैत यांच्याकडे सुपूर्द केले. यासोबतच कुस्तीपटूंनी याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

- Advertisment -