Coronavirus: भारतातील ‘या’ सात राज्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल करू नका – WHO

WHO team will visit China to find out where exactly was coronavirus born
कोरोनाचे मूळ उगमस्थान शोधण्यासाठी WHOचे पथक चीन दौरा करणार

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनामुळे तीन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख ३८ हजारहून अधिक आहे. तर मृतांचा आकडा ४ हजारहून अधिक आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील सात राज्यांमधील लॉकडाऊन शिथिल न करण्याचा सल्ला दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं की, जास्त प्रभावित असलेल्या राज्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल केल्यास अधिक गंभीर परिस्थितीत होऊ शकते. तसंच अजून बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागेल.

जागतिक आरोग्य संघटनेने महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, चंदीगढ आणि बिहार सारख्या राज्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यास मनाई केली आहे. देशातील ही राज्य कोरोनाने जास्त प्रभावित आहेत. या राज्यांत सूट देणे म्हणजे आपल्या घरी कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊनचे पालन करणे फार महत्त्वाचे आहे.

कोविड-१९ ट्रॅकर इंडियाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख ३९ हजार ४९ आहे. तर मृतांचा आकडा ४ हजार २४ झाला आहे. तसंच दिलास देणारी बाब म्हणजे ५७ हजार ७०० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचा फटका महाराष्ट्राला बसला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे ५० हजारहून अधिक रुग्ण आहे. तर महाराष्ट्रापाठोपाठ असलेल्या तमिळनाडू राज्यात १६ हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत.


हेही वाचा – वैमानिकाच्या ‘या’ चुकीमुळे पाकिस्तानमध्ये विमानाचा झाला मोठा अपघात!