घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटडॉक्टरांना विचारल्याशिवाय हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेऊ नका; मृत्यू होऊ शकतो

डॉक्टरांना विचारल्याशिवाय हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेऊ नका; मृत्यू होऊ शकतो

Subscribe

अमेरिकेने या औषधाची मागणी भारताकडे केली आहे. त्यानंतर हे औषध अनेक भागातील मेडिकल स्टोअरमधून संपलं आहे.

कोरोना विषाणूने जगभर कहर केला आहे. देशातही कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना महामारीच्या या युद्धात, हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाबद्दल सर्वाधिक चर्चा केली जात आहे. वास्तविक, अमेरिकेने या औषधाची मागणी भारताकडे केली आहे. त्यानंतर हे औषध अनेक भागातील मेडिकल स्टोअरमधून संपलं आहे. हे औषध चर्चेत आल्यानंतर लोकांनी मोठ्या प्रमाणात हे विकत घेतलं आहे, परंतु डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हे औषध घेतल्यास प्राणघातक ठरु शकतं. पूर्व दिल्लीतील शाहदरा येथे गोयल मेडिकल स्टोअर चालवणारे बन्सल गोयल म्हणतात की, हे औषध तीन मोठे ब्रॅण्ड बनवतात, परंतु औषधातील सर्वात नामांकित ब्रँडचा साठा संपला आहे. पुरवठा कमी होत आहे आणि सुरुवातीला लोकांनी मोठ्या प्रमाणात हे औषध खरेदी केलं. तथापि, निर्देश आल्यानंतर आता हे औषध केवळ नियमांच्या आधारे दिलं जात आहे.


हेही वाचा – टिकटॉक स्टारने उडवली मास्कची खिल्ली, आता त्यालाच कोरोनाची लागण

- Advertisement -

लोक हे औषध का घेत आहेत या प्रश्नावर मॅक्सिमम हेल्थकेअरचे असोसिएट डायरेक्टर डॉ. रोमेल टिकू म्हणाले की कोरोनाच्या गंभीर रूग्णांच्या उपचारासाठी याचा उपयोग केला जात आहे. कारण कोरोनावर अद्याप दुसरं औषध नाही. ते म्हणाले की, कोरोनावर या औषधाच्या वापराबद्दल ठोस असं काहीच सांगता येणार नाही. त्यांनी वैद्यकीय सेवेच्या वापरासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितलं. हृदय, रेटिनासंबंधित डोळ्याच्या समस्या, यकृत आणि मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त लोकांसाठी हे सुरक्षित नाही. याशिवाय मळमळ, अतिसार, मनःस्थितीत बदल आणि त्वचेवर पुरळ यासारखे दुष्परिणाम देखील होऊ शकतात. हृदयाच्या कार्यामध्ये धोकादायक ठरु शकतं. बर्‍याच घटनांमध्ये गंभीर नुकसान, अगदी मृत्यूची नोंद आहे.

इंडियन स्पाइनल इंज्युरी सेंटरचे संचालक डॉ. एचएस छाब्रा म्हणाले की डोनाल्ड ट्रम्प यांनी या औषधाची मागणी केली आहे. ते मानतात की ते कोरोनावर उपचार करण्यास उपयुक्त आहे, परंतु अद्याप हे औषध प्रभावी आहे की नाही याचा कोणताही पुरावा नाही. या औषधाच्या नियमित वापराचे तोटे सांगताना ते म्हणाले की डोळयातील पडदा खराब होऊ शकतो तसेच त्वचेवर पुरळ उठणे, छातीत अस्वस्थता, खोकला, अतिसार, चक्कर येणे हे इतर आजार देखील होऊ शकतात. डॉक्टर छाबरा म्हणाले की मूत्रपिंड आणि यकृत रोगाने ग्रस्त असलेल्या लोकांनी त्याचे सेवन करू नये.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -