घरCORONA UPDATECovid-19 लक्षणांसाठी लहान मुलांना मोठ्यांची औषधे देताय? केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स वाचा

Covid-19 लक्षणांसाठी लहान मुलांना मोठ्यांची औषधे देताय? केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स वाचा

Subscribe

'स्वत: डॉक्टर बनून प्रौढांची औषधांचा वापर लहान मुलांसाठी करु नका', असे स्पष्ट आदेश केंद्राकडून देण्यात आले आहेत.

देशात कोरोनाने थैमान घातले आहेत. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहेत. त्यामुळे आता लहान मुलांची विशेष काळजी घेण्यात येत आहेत. कोरोना विषयी उलट सुलट खोट्या बातम्या, मेसेज सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यावर विश्वास ठेवून अनेकांनी आतापर्यंत चुकीचे प्रयोग देखील करुन पाहिले आहेत. त्याचप्रमाणे आपल्याकडे बऱ्याचदा लहान मुलांना काही झाल्यास त्यांना घरात असलेली प्रौढांची औषधे सर्रासपणे देण्यात येतात. मात्र अशा औषधांमुले भविष्यात लहान मुलांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यत असते. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लहान मुलांवरील कोरोना उपचारांसाठी नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.  बुधवारी केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेत ‘स्वत: डॉक्टर बनून प्रौढांची औषधांचा वापर लहान मुलांसाठी करु नका’, असे स्पष्ट आदेश  देण्यात आले आहेत. (Do not use adults corona drugs for children, guidelines issued by central government)

प्रौढांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांमध्ये आयवरमेक्टिन, हायड्रोक्सीलोरोक्वीन, फेविपिरावीरसारक्या औषधांचा वापर केला जातो. अशा औषधांचा वापर लहान मुलांसाठी न करण्याचा सल्ला केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे. ‘स्वत: डॉक्टर बनू नका, तुमची एक चूक महागात पडेल’, अशा शब्दात केंद्र सरकारने सल्ला दिला आहे.

- Advertisement -

लहान मुलांसाठी केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स

  • लहान मुलांना कोरोना संबंधित कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास घरातील प्रौढांची औषधे न देता त्यांना त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जा.
  • मुलांना कोणतेही चुकीचे औषध देऊ नका. त्याने मुलाच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
  • सोशल मीडियावरील कोणत्याही फॉरवर्ड मेसेज वर विश्वास ठेवून मुलांवर कोणतेही चुकीचे प्रयोग करु नका.
  • डॉक्टरांच्या कोणत्याही चिठ्ठीशिवाय औषधे घेऊ नका.
  • मुलांना लवकरच कोरोना लस द्या. लसीविषयी त्यांच्या मनातील भिती काढून टाकण्यासाठी मदत करा.

लहान मुलांच्या आरोग्यासाठी सध्या उपलब्ध असणाऱ्या कोविड सेंटरची संख्या वाढवायला हवी. या केंद्रामध्ये लहान मुलांना लागणारी वैद्यकीय उपकरणे आणि औषधांची गरज भासणार आहे. त्यामुळे सर्व राज्यांनी यासाठी तयार रहा,असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – India Corona Update: ७१ दिवसांनी देशातील Active रुग्णांच्या संख्येत मोठी घट+

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -