सेल्फी काढायला गेलेली पत्नी डोळ्यांसमोरुन अचानक झाली गायब!

doctor wife taking selfie falling taking lali dame vidisha bhopal
सेल्फी काढायला गेलेली पत्नी डोळ्यांसमोरुन अचानक झाली गायब!

सेल्फी काढणे हे प्रत्येकाला आवडते. पण सेल्फी कुठे आणि केव्हा काढायची हे माहित असणं फार गरजेचं असतं. सेल्फीच्या मोहापायी अनेकांनी जीव गमावले आहेत. हे माहिती असूनही अनेक जण धोक्याच्या ठिकाणी सेल्फी काढत असतात. असाच प्रकार भोपालमध्ये घटला आहे. सेल्फी काढायला गेलेली पत्नी डोळ्यांसमोरुन अचानक गायब झाल्याची घटना घडली आहे. भोपाल जवळील हलाली धरणच्या येथे फिरायला गेलेल्या डॉक्टरांसोबत दुःखत घटना घडली आहे. धरणाजवळ त्याची पत्नी सेल्फी काढत असताना तिचा तोल गेला आणि ती १० ते १२ फूट खोल पाण्यात पडली.

नक्की काय घडले?

भोपालच्या कोलार येथे राहणारे डॉ. उत्कर्ष मिश्रा, पत्नी हिमानी मिश्रासोबत भोपालपासून सुमारे ४० कि.मी अंतरावरील हलाली धरणाचा येथे फिरायला गेले होते. रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे भोपालहून बरेच लोक येथे आले होते. माहितीनुसार, डॉक्टर उत्कर्ष मिश्रा त्यांच्या मोबाईलवरील मेसेज वाचत होते. त्यादरम्यान त्यांची पत्नी हिमानी मिश्रा मोबाईलवर सेल्फी घेण्यासाठी गेली आणि तिचा पाय कधी घसरला हे त्यांनाच कळाले नाही. पत्नी १० ते १२ फूट खाली पाण्यात पडली. डॉक्टरांच्या डोळ्यांसमोरुन पत्नी कधी गायब झाली हे देखील त्यांना कळाले नाही.

या घटनेनंतर मदत पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. हे बचावकार्य रात्रभर सुरू होते पण मृतदेह सापडला नाही. मग पुन्हा सोमवारी सकाळी बचाव कार्य सुरू झाले. पण अजूनपर्यंत महिलेचा मृतदेहाची माहिती मिळाली नाही आहे.


हेही वाचा – धक्कादायक! नोकरीचे आमिष दाखवून रेल्वे अधिकाऱ्यांनी तरुणीवर केला सामूहिक बलात्कार!