घरदेश-विदेशDoctors Day : आरजे, मॉडेल, शिक्षिका डॉ. गीता प्रकाश यांचा अनोखा प्रवास

Doctors Day : आरजे, मॉडेल, शिक्षिका डॉ. गीता प्रकाश यांचा अनोखा प्रवास

Subscribe

डॉ. गीता प्रकाश आजही त्यांच्या वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांचं आयुष्य अगदी स्वछंदी जगत आहेत. आणि याच डॉ. गीता प्रकाश आज अनेकांच्या आदर्श बनल्या आहेत. आज डॉक्टर्स डे (Doctors Day) निमित्ताने गीता प्रकाश यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत.

१ जुलै रोजी देशभरात डॉक्टर्स डे(Doctors Day) साजरा केला जातो. देवाचं दुसरं रूप हे डॉक्टर्सना मानलं जातं. डॉकटर्स हे नेहमीच आपल्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावत असतात. आणि याचा प्रत्यय कोव्हीडच्या काळात प्रत्येकालाच आला. आज अशाच एका कतृत्ववान महिलेची आम्ही तुम्हाला ओळख करून देणार आहोत. जगाची बंधनं झुगारून डॉ. गीता प्रकाश आजही त्यांच्या वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांचं आयुष्य अगदी स्वछंदी जगत आहेत. आणि याच डॉ. गीता प्रकाश आज अनेकांच्या आदर्श बनल्या आहेत. आज डॉक्टर्स डे (Doctors Day) निमित्ताने गीता प्रकाश यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत.

आणखी वाचा – आजपासून जगन्नाथ रथ यात्रेला सुरुवात, लाखो भक्तांची उपस्थिती

- Advertisement -

 

लहान पानापासून होतं डॉक्टर बनण्याचं स्वप्न –

- Advertisement -

डॉ. गीता प्रकाश(DR. geeta prakash) यांचं बालपण शिमला येते गेलं. त्यांचं बालपणही खूप रंजक होतं. आपण डॉक्टर व्हावं असं त्यांना लाकांपणापासूनच वाटत होतं. डॉक्टर व्हावं हे गीता यांचं लहानपणापासूनचं स्वपन होतं, हेच स्वप्न त्यांनी मोठं झाल्यावर प्रत्यक्षात साकार केलं. त्यासाठी गीता यांना त्यांच्या कुटुंबीयांची आणि प्रामुख्याने आईची त्यांना खूप साथ मिळाली. गीता यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या बठिंब्यामुळे त्यांच्या वयाच्या २१ व्या वर्षी डॉक्टर ही पदवी मिळवली. आणि गीता प्रकाश डॉ. गीता प्रकाश बनल्या

 

आणखी वाचा –  …तर धनुष्याची दोरी मागे ओढावी लागते; राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र

 

सर्वात आधी डॉकटर, मग शिक्षिका त्या नंतर आरजे –

 

गीता प्रकाश(geeta prakash) नोकरी करत असतानाच त्यांना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार भेटला. लग्न झाल्या नंतर गीता यांनी स्वतःच घर आणि मुलं सांभाळत स्वतःचं करियर सुद्धा घडवत होत्या. गीता प्रकाश त्यांच्या आयुष्यात स्थिरावल्या होत्या. सगळं सुरळीत सुरु असताना गीता यांना वाटलं की आपण अजूनही काही शिकावं किंवा अजूनही काही करावं त्यांची हीच जिद्द त्यांना आणखी बऱ्याच गोष्टी करण्यासाठी महत्वपूर्ण ठरली. त्याचदरम्यान मुलांचं संगीपण करताना त्यांना पूर्ण वेळ देता यावा यासाठी त्यांनी शिक्षिका म्हणून शाळा जॉईन केली. त्यांनतर वयाच्या ५० व्या वर्षी गीता प्रकाश यांना एक वेगळच क्षेत्र साद घालत होतं. ते म्हणजे आरजे चं (RJ) गीता प्रकाश यांनी आरजे बनत श्रोत्यांना हेल्थ टिप्स शेअर करू लागल्या.

 

आणखी वाचा – Vegan Diet म्हणजे काय ? बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा करतात फॉलो

वयाच्या ५७ व्या वर्षी बनल्या मॉडेल –

 

काळ जसा पुढे सरकत होता तसंच गीता यांना आणखी काही क्षेत्र सुद्धा खुणावत होती. गीता यांना आरजे च्या भूमिकेतून आनंद मिळत असतानाच त्यांनी मॉडेलिंग(modelling) या क्षेत्रातही स्वतःला सिद्ध केलं. गीता यांच्या एका पेशंटने त्यांना मॉडेलिंगची ऑफर दिली. आणि या प्रवासात गीता यांना त्यांच्या मुलांकडून भक्कम पाठिंबा मिळाला. गीता याना याही क्षेत्रात काम करणं जमू शकतं असा विश्वास त्यांच्या मुलांनी त्यांच्या मनात निर्माण केला. गीता यांनी मॉडेलिंगचा प्रवास सुरु केला त्यानंतर त्यांना अनेक मोठ्या ब्रँड्स सोबत काम करता आले.  गीता प्रकाश यांना फेमिना(femina) या मासिकामध्ये फ्रंट पेज वर स्टेषन सुद्धा मिळाले. हा एक प्रकारे त्यांच्या कामाचा सन्मानच होता.

आणखी वाचा –  Be careful : ‘फ्रुट शेक’ पिणे किती फायदेशीर? वाचा काय सांगतं ‘आयुर्वेद’

अश्याप्रकारे डॉ. गीता प्रकाश(DR. geeta prakash) यांनी शिक्षिका, डॉक्टर. मॉडेल आणि आरजे अश्या सगळ्या क्षेत्रांमध्ये मुसाफिरी करत गीता प्रकाश आजही त्यांचं आयुष्य उत्त्पणे जगात आहेत. आणि त्या सर्वांच्या आदर्श सुद्धा बनल्या आहेत.

 

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -