घरCORONA UPDATE१० तासांच्या शिफ्टनंतर असा झाला डॉक्टरचा हात; जिल्हाधिकाऱ्यांनीही केला सलाम!

१० तासांच्या शिफ्टनंतर असा झाला डॉक्टरचा हात; जिल्हाधिकाऱ्यांनीही केला सलाम!

Subscribe

सध्या आख्खा देशच नाही तर आख्खं जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. या संकटकाळात हजारो लाखो कोरोना योद्धे रुग्णालयात, पोलिस स्टेशनांत, रस्त्यावरच्या बंदोबस्ताच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटापासून सामान्य नागरिकांना वाचवण्याचं महाकठीण काम करत आहेत. या योद्ध्यांना सगळ्यांनीच आदराने सलाम ठोकला असला, तरी त्यांच्यावरच्या कामाचा ताण किती भयानक असू शकतो, याची प्रचिती आपल्याला घरी बसून येऊ शकत नाही. पण ती प्रचिती देणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वी अनेक नर्स, डॉक्टरांचे खूप वेळ मास्क लावल्यामुळे चेहऱ्याला झालेल्या दुखापतीचे फोटो व्हायरल झाले होते. आता कोविड १९ वॉर्डमध्ये १० तास शिफ्ट केलेल्या एका डॉक्टरच्या हाताचा फोटो व्हायरल होतो आहे. आणि हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी!

- Advertisement -

छत्तीसगडची राजधानी रायपूरचे जिल्हाधिकारी अवनीश शरण यांनी १९ जून रोजी एका तळहाताचा फोटो त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या तळहाताला खूप घट्टे पडले आहेत. सुरकुत्या पडल्या आहेत. पूर्ण तळहातावर एकही अशी जागा शिल्लक नाही जिथे सपाट त्वचा दिसू शकेल. या फोटोसोबत केलेल्या ट्वीटमध्ये अवनीश शरण म्हणतात, ‘१० तास पीपीई किट घालून ड्युटी केल्यानंतर त्या किटमधून काढलेला एका डॉक्टरचा हा हात. कोरोनाशी दोन हात करणाऱ्या आपल्या फ्रंटलाईन योद्ध्यांना सलाम!’

अवनीश शरण यांनी हा फोटो ट्वीट केल्यानंतर त्यावर देशातल्या इतरही रुग्णालयातल्या डॉक्टरांनी आपल्या तळहातांचे फोटो ट्वीट करून या कोरोनाच्या काळात सामना कराव्या लागणाऱ्या तणावाच्या परिस्थितीचा परिचय करून दिला.

- Advertisement -

खरंतर या काळात प्रत्येकजण आपापलं कर्तव्य आणि काम पार पाडून कोरोनाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लढाच देत आहे. मात्र, रुग्णालयात थेट कोरोनाशी भिडणाऱ्या या डॉक्टरांना आपलं महानगर-माय महानगरचा सलाम!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -