घरदेश-विदेशकोरोना फुफ्फुसावरच नाही तर हृदय, मेंदूसह इतर अवयवांवरही करतो हल्ला!

कोरोना फुफ्फुसावरच नाही तर हृदय, मेंदूसह इतर अवयवांवरही करतो हल्ला!

Subscribe

न्यूयॉर्कच्या डॉक्टरांनी घेतला रुग्णांच्या अहवालाचा आढावा

कोरोना विषाणू केवळ मनुष्याच्या फुफ्फुसांवरच हल्ला करत नाही तर मूत्रपिंड, यकृत, हृदय, मेंदू, मज्जासंस्था, त्वचा आणि Gastrointestinal Tract ला देखील नुकसान करते, असे न्यूयॉर्कच्या डॉक्टरांनी रुग्णांच्या अहवालाचा आढावा घेतल्यावर हे सांगितले आहे. न्यूयॉर्क हे कोरोना विषाणूमुळे बळी पडलेल्या शहरांपैकी एक आहे.

न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया युनिव्हर्सिटी इरव्हिंग मेडिकल सेंटरच्या डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्या रूग्णांसह जगभरातील इतर वैद्यकीय पथकाच्या अहवालांचा आढावा घेतला. काही महिन्यांपूर्वी इरव्हिंग मेडिकल सेंटरमध्ये मोठ्या संख्येने कोरोना रूग्ण दाखल झाले होते.

- Advertisement -

सीएनएनच्या अहवालानुसार, डॉक्टरांनी कोरोना रूग्णांच्या अहवालाचा आढावा घेतल्यानंतर असे आढळले की कोरोना विषाणू माणसाच्या जवळजवळ प्रत्येक महत्वाच्या अवयवाला लक्ष्य करते. कोरोना विषाणूमुळे रुग्णांच्या अवयवांना थेट नुकसान होते आणि रक्त गोठण्यास सुरूवात होते. तसेच माणसाच्या हृदयाच्या
ठोक्यांवर देखील परिणाम होतो, किडनीतून रक्त येऊ लागते, त्वचेवर पुरळ दिसून येते.

शरीराच्या विविध भागात कोरोनाच्या हल्ल्यामुळे रुग्णांना डोकेदुखी, चक्कर येणे, स्नायू दुखणे, पोटदुखी आणि इतर समस्या निर्माण होऊ लागतात. यासह, फुफ्फुसांच्या संसर्गामुळे कफ आणि ताप देखील येण्यास सुरूवात होते.

- Advertisement -

आजतक ने दिलेल्या माहितीनुसार, आढावा पथकातील कोलंबिया विद्यापीठाचे कार्डियोलॉजिस्ट डॉ. आकृति गुप्ता म्हणाले की, कोरोना रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, कोरोना हा मल्टीसिस्टम रोग आहे. ते म्हणाले की मूत्रपिंड, हृदय आणि मेंदूच्या नुकसानीमुळे ग्रस्त असलेल्या रूग्णांची संख्या मोठी आहे, म्हणूनच फुफ्फुसातील संसर्ग तसेच वेगवेगळ्या समस्यांसाठी डॉक्टरांनी उपचार केले पाहिजेत.

कोरोना विषाणू थेट रुग्णांच्या मेंदूवर हल्ला करतो. डॉक्टरांच्या मते, ज्या रुग्णांना व्हेंटिलेटरवर बराच काळ ठेवण्यात आले आहे त्यांना देखील उपचारांच्या औषधांचा त्रास होऊ शकतो त्यामुळे रूग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल इफेक्ट देखील दिसू शकतो. दरम्यान,  आतापर्यंत, जगात कोरोनाने संक्रमित लोकांची संख्या १२,७२८,९६६ ओलांडली आहे. तर कोरोनामुळे ५ लाख ६५ हजार ३५१ लोक मरण पावले आहेत.


महाराष्ट्राला मिळणार दोन लाख रेमडेसिवीर इंजेक्शन
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -