घरदेश-विदेशDog Meat : गुवाहाटी हायकोर्टाने श्वानाच्या मांस विक्रीवरील बंदी उठवली

Dog Meat : गुवाहाटी हायकोर्टाने श्वानाच्या मांस विक्रीवरील बंदी उठवली

Subscribe

 

गुवाहटीः Dog Meat श्वानाचे मांस विक्री व बाळगण्यावर नागालॅंड सरकारने घातलेली बंदी गुवाहाटी उच्च् न्यायालयाच्या The Kohima खंडपीठाने रद्द केली. न्या. मारली वानकुंग यांनी हा निकाल दिला. कोणत्याही कायदेशीर आधाराशिवाय अशी बंदी घातली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

- Advertisement -

नागालॅंड सरकाच्या मंत्रिमंडळ बैठकीत ४ जुलै २०२२ रोजी श्वानाचे मांस विक्री व बाळगण्यावर निर्णय घेण्यात आला. असे असले तरी विधिमंडळात तसा कायदा मंजूर झालेला नाही. त्यामुळे हा निर्णय वैध धरता येणार नाही, असे न्यायालयाने निकालात नमूद केले.

मुळात अन्न सुरक्षा व दर्जाचा दाखला देत नागालॅंड सरकारने ही बंदी आणली होती. मात्र अन्न सुरक्षा आणि दर्जा कायद्यात श्वासाचे मांस विक्रीवर बंदी आणणारी कोणतीच तरतूद नाही. कायद्यात तरतूद नसल्याने त्यात आश्चर्य व्यक्त करण्यासारखे काही नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

- Advertisement -

नागालॅंडच्या उत्तरेकडील काही भागात श्वानाचे मांस खातात. अन्य भागात श्वानाचे मांस खल्ले जात नाही. श्वानाच्या मांस विक्रीवर बंदी आणणे हे मान्य होऊ शकत नाही. काही नागरिकांचे ते उपजिवेकेचे साधन आहे. मुळात श्वानाच्या मांसावर बंदी आणण्याचा अधिकार हा केवळ अन्य सुरक्षा आयुक्त किंवा मुख्य सचिवांना आहे, असेही न्यायालयाने निकालात म्हटले आहे.

श्वानाची कत्तल करणे स्वच्छतेच्या दृष्टीने घातक नाही किंवा कत्तलखान्याच्या नियमांविरोधी नाही. परिणामी श्वानाच्या मांसावर बंदी आणणे व्यवहार्य होत नाही. कत्तल करण्याआधी श्वानांना त्रास होत असेल तर प्राणी हिंसाचार कायद्यानुसार त्यासाठी उपाय योजना करता येतील, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले.

श्वानांना आसामला सोडा; बच्चू कडूंनी दिला होता अजब सल्ला

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार अतुल भातखळकर यांनी भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबतचा प्रस्ताव अधिवेशनात मांडला. या प्रस्तावावर चर्चा करताना प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला एक अजब सल्ला दिला. भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दलच्या प्रस्तावावर सभागृहात चर्चा करताना आमदार बच्चू कडू म्हणाले होते की, “खरे तर भटक्या कुत्र्यावर सोप्पा इलाज आहे. पाळीव कुत्रे रस्त्यांवर येत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. याच्यावर समिती नेमण्यापेक्षा कृती योजना जाहीर करायला हवी. एखाद्या शहरात तसा प्रयोग करण्यात यावा, नाही तर रस्त्यांवर असलेल्या भटक्या कुत्र्यांना उचलून आसाममध्ये नेऊन टाका. आसाममध्ये कुत्र्यांना किंमत आहे. आठ ते नऊ हजार रुपयांना कुत्रे विकले जातात. आम्ही गुवाहाटीला गेल्यावर तिथे आम्हाला कळलं. जसं आपल्याकडं बोकडाचं मांस खाल्लं जातं. तसे, तिकडे कुत्र्यांचं मांस खाल्लं जातं. त्यामुळे तेथील व्यापाऱ्याला बोलवून यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. एक दिवसांत याच्यावर तोडगा निघेल. यासाठी तेथील सरकारशी बोलण्याची गरज आहे. याचा उद्योग होईल आणि ते घेऊन जातील. एकदाचा विषय संपवून टाका,”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -