घरCORONA UPDATEश्वान पथक करणार कोरोनाची चाचणी

श्वान पथक करणार कोरोनाची चाचणी

Subscribe

जगभऱात हाहाकार उडवणाऱ्या कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संशोधक अहोरात्र मेहनत करत आहेत. पण अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणारी लस शोधून काढण्यात कोणासही यश मिळालेले नाही. यामुळे लंडनमधील शास्त्रज्ञांनी कोरोनाचा बिमोड करण्यासाठी कुत्र्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार इतर प्राण्यांच्या तुलनेत कुत्रा या प्राण्यात उपजतच सुंघण्याची शक्ती ही अधिक संवेदनशील असते. यामुळे कुठल्याही आरोपीचा ते सहज माग काढू शकतात. त्यांच्यातील याच वैशिष्टयाचा वापर कोरोना व्हायरस शोधण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. जेणेकरून कोरोना व्हायरस कुठे आहे हे कुत्रा अचूक सांगू शकेल व पुढील अनर्थ टळेल.

लंडममधील स्कूल ऑफ हायजेनिक अँड ट्रॉपिकल मेडिसीन (LSHTM) ने ब्रिटनच्या एका वेबसाईटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. कुत्रा मलेरियाचे विषाणूही सुंघून ओळखतो. यामुळे तो कोरोनाचे विषाणूही शोधण्यास मदत करू शकेल असा विश्वास या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. यासाठी लवकरच कुत्र्यांना खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक आजाराचा विशिष्ट प्रकारचा गंध असतो. यामुळे कुत्रा कोवीड १९ अचूकपणे सुंघून ओळखो शकतो. यावर आधारित अनेक प्रयोग केले गेले असून ते सर्वच यशस्वीही झाले आहेत. यामुळे येत्या काही दिवसात कोरोनाला शोधण्यात कुत्रा महत्वाची भूमिका बजावताना दिसणार आहे. सर्वप्रथम हा प्रयोग विमानतळावर केला जाणार आहे. असेही लंडममधील स्कूल ऑफ हायजेनिक अँड ट्रॉपिकल मेडिसीन विभागाने सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -