घरCORONA UPDATEDomestic Flights : रेल्वेपाठोपाठ विमानवाहतूक सुरू होणार; २५ मेची तारीख ठरली!

Domestic Flights : रेल्वेपाठोपाठ विमानवाहतूक सुरू होणार; २५ मेची तारीख ठरली!

Subscribe

भारतीय रेल्वेने १ जूनपासून मर्यादित प्रमाणात का होईना, पण रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत नागरी उड्डाण मंत्रालयाने देखील विमान वाहतूक सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. येत्या २५ मे पासून म्हणजे अवघ्या ५ दिवसांमध्ये देशांतर्गत प्रवासी विमान वाहतूक सुरू करणार असल्याची घोषणा नागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केली आहे. ट्वीट करून त्यांनी हे जाहीर केलं आहे. ‘देशांतर्गत विमान वाहतूक येत्या सोमवारी २५ मे पासून सुरू होणार असून त्यासंदर्भात सर्व विमान कंपन्यांना कळवण्यात आलं आहे. विमान वाहतुकीदरम्यान प्रवाशांनी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, यासंदर्भातले मार्गदर्शक नियम देखील जारी करण्यात येतील’, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, किती विमानं सुरू होतील, किती प्रवाशांना परवानगी असेल, यासंदर्भात या ट्वीटमध्ये माहिती देण्यात आलेली नाही.

- Advertisement -

रेल्वेने देखील मंगळवारी सामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. येत्या १ जूनपासून रेल्वे वाहतूक सुरू होणार असून दिवसाला २०० ट्रेन सोडल्या जाणार आहेत. त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि सुरक्षेचे नियम पाळूनच नागरिकांना प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भात ट्वीट करून घोषणा केली होती. तसेच, सध्या विविध राज्यांमध्ये अडकून पडलेल्या स्थलांतरीतांना आपापल्या राज्यात, आपल्या घरी परतण्यासाठी २०० ट्रेन दिवसाला सुरू आहेत. त्या ट्रेनची संख्या देखील वाढवणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्वीटच्या माध्यमातून केली आहे. या पार्श्वभूमीवर आता विमान वाहतूक देखील सुरू होणार असल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -