अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मॉडेलच्या पायाखाली, टाईम्स स्क्वेअर चौकात पोस्टर!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं एक पोस्टर टाईम्स स्क्वेअर येथे लागलं आहे. या पोस्टरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा चेहरा एक मॉडेल पायाने दाबत असल्याचं दाखवण्यात आलं आहे.

donald trump billboard (Photo - AP)
डोनाल्ड ट्रम्प यांचं हेच ते पोस्टर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अनेक कारणांमुळे चर्चेत असतात. कधी ते त्यांच्या वागण्या-बोलण्याच्या पद्धतीमुळे चर्चेत असतात, तर कधी ते त्यांच्या भूतकाळामुळे चर्चेत येतात. त्यांचा लहरी स्वभाव तर जगजाहीर आहे. आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प हे नाव चर्चेत आलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो असलेलं एक पोस्टर अमेरिकेची राजधानी असलेल्या न्यूयॉर्क शहरातल्या सर्वात महत्त्वाच्या आणि सर्वात प्रसिद्ध असलेल्या टाईम्स स्क्वेअरमध्ये लावण्यात आलं आहे. याच टाईम्स स्क्वेअरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची झालेली सभा प्रचंड गाजली होती. मात्र, याच चौकात आता ट्रम्प यांचं हे पोस्टर लागल्यानंतर त्यावर अमेरिकी राजकीय वर्तुळात आणि माध्यम विश्वात मोठी चर्चा होऊ लागली आहे.

पेंटॅगॉनसमोरच ट्रम्प बंदिस्त!

या पोस्टरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना खाली जमिनीवर पाडण्यात आलं आहे. त्यांच्या डोक्यावर मिचेल मेसा नावाच्या एका जिमच्या कपड्यांमध्ये असलेल्या मॉडेलने पाय ठेवला आहे. ती ट्रम्प यांचं डोकं पायानं दाबत आहे. वर ट्रम्प यांना लाल, पांढऱ्या आणि निळ्या दोरीने तिने बांधून ठेवलं आहे. या दोघांच्या मागे अमेरिकेचा राष्ट्रध्वज आणि पेंटॅगॉनची अमेरिकी संरक्षण खात्याची मोठी इमारत देखील दिसत आहे. खाली ही जाहिरात करणाऱ्या ध्वनी या कंपनीची टॅगलाईन देखील आहे.

सरकारी धोरणाचा निषेध

या पोस्टरविषयी सांगताना ध्वनी या कपड्यांचं उत्पादन घेणाऱ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओ अवी ब्राऊन म्हणाले, ‘हे पोस्टर ट्रम्प प्रशासनाच्या आरोग्यविषयक धोरणाचा निषेध करतं. ट्रम्प यांनी परस्परच गर्भपात, गर्भनिरोध आणि लैंगिक शिक्षणासंदर्भात बंधनं लादणारा निर्णय घेतला आहे. हे पोस्टर त्याचाच निषेध करतं. हे पोस्टर म्हणजे हिंसेचं समर्थन नसून आमचे हक्क परत मिळवण्याचं प्रतिक आहे.’

ट्रम्प यांच्या मुलाने केला निषेध

दरम्यान, हे पोस्टर लागल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांनी तीव्र भावना व्यक्त केली आहे. ‘ट्रम्प यांच्या मियामी गोल्फ रिसॉर्टवर झालेल्या कॉन्फरन्सचा व्हिडिओ जसा माध्यमांनी व्हायरल केला होता, त्यावरून ट्रम्प यांच्यावर टीका केली होती, तशाच प्रकारे या पोस्टरची देखील समीक्षा व्हावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. या रिसॉर्टमध्ये ट्रम्प प्रसारमाध्यमं आणि इतर समीक्षकांची हत्या करत आहेत, असं दाखवणारं व्यंगचित्र ठेवण्यात आलं होतं.