घरताज्या घडामोडीचीन भारताला धमकवत आहे का? डोनाल्ड ट्रम्प म्हणतात!

चीन भारताला धमकवत आहे का? डोनाल्ड ट्रम्प म्हणतात!

Subscribe

काही महिन्यांपासून सुरू असलेला भारत- चीन सीमा वाद पुन्हा एकदा तीव्र होत आहे. चीनच्या वारंवार सुरू असलेल्या कुरापतींना आता अमेरिकासुध्दा वैतागली आहे. त्यामुळे भारत चीन सीमा विवादात भारताला मदत करण्यासाठी तयार आहोत असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. भारत-चीन सीमा विवाद सोडवण्यासाठी भारताच्या मदतीस अमेरिका सज्ज आहे असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

ट्रम चीन –भारत वादावर बोलताना पुढे म्हणाले, भारत- चीन सीमेवर तणाव खूप वाढला आहे. दोघांमध्ये खूप वाईट गोष्टी सुरू आहेत. या दोन्ही देशांच्या वादात मला मध्यस्थी करावी लागेल आणि मी ही समस्या सोडवण्यासाठी मदत करण्यास तयार आहेत. मला मदत करायला आवडेल. असं ट्रम्प पुढे बोलताना म्हणाले. व्हाईट हाऊसमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी दिली.

- Advertisement -

चीन भारताला धमकवत आहे का?

चीन भारताला धमकवत आहे का? असा प्रश्न विचारल असता ‘असं होऊ नये अशी आमची आशा आहे. पण चीन नक्कीच या दिशेनं वाटचाल करत आहे. हे सगळ्यांच्या लक्षात येत आहे’ असं उत्तर ट्रम्प यांनी दिलं.


हे ही वाचा – भारत-चीनच्या संरक्षणमंत्र्यांमध्ये बैठक: LAC वरील परिस्थिती जैसे थे करा – राजनाथ सिंह


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -