घरताज्या घडामोडीडोनाल्ड ट्रम्प यांचा फेसबुक,ट्विटर आणि गुगल विरोधात खटला दाखल

डोनाल्ड ट्रम्प यांचा फेसबुक,ट्विटर आणि गुगल विरोधात खटला दाखल

Subscribe

फेसबुक, गुगल आणि ट्विटर सोबत त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg)  सुंदर पिचाई (Sundar Pichai) आणि जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांच्या विरोधात खटला दाखल

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी तंत्राज्ञान क्षेत्रातील महत्त्वाच्या आणि दिग्गज सोशल मीडिया कंपनी असलेल्या फेसबुक (Facebook)  ट्विटर (Twitter)  आणि गुगल (Google)  यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. (Donald Trump File Lawsuit againts Facebook, Twitter and Google) बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी याविषयीची माहिती दिली. या सोशल मीडिया कंपनीने चुकीच्या पद्धतीने कारवाई करत असल्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प यांनी हा खटला दाखल केला आहे. न्यू जर्सीच्या बेडमिंस्टरमधील गोल्फ क्लबमध्ये मीडियाशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेच्या फर्स्ट पॉलिसी इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने मी फेसबुक, गुगल आणि ट्विटर सोबत त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg)  सुंदर पिचाई (Sundar Pichai) आणि जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांच्या विरोधात खटला दाखल करत असल्याचे सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ६ जानेवारी रोजी अमेरिकन कॅपिटलवर झालेल्या हिंसेनंतर त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली. ६ जानेवारीच्या घटनेशी संबंधित इतर हजारो लोकांचे अकाउंट देखील बंद करण्यात आले. या सोशल मीडिया कंपनी देशातील अशाप्रकारच्या बेकायदेशीर, असंवैधानिक सेन्सॉरशिपच्या प्रवर्तक बनल्या असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसेविरोधात आजही FBI (Federal Bureau of Investigation)
मध्ये खटला सुरु आहे. यात ५०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली. House of Representatives च्या प्रतिनिधी नेन्सी पेलोसी यांनी गेल्या आठवड्यात या हिंसेच्या तपासासाठी नवीन कमिटीची स्थापना केली आहे.


हेही वाचा – देशात कोरोना महामारीची धोकादायक स्थिती; जगातील मृतांची संख्या ४० लाखांच्या पार – WHO

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -