Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश डोनाल्ड ट्रम्पंच्या अडचणीत वाढ; लैंगिक गैरवर्तनप्रकरणी न्यायालयाने ठरवले दोषी

डोनाल्ड ट्रम्पंच्या अडचणीत वाढ; लैंगिक गैरवर्तनप्रकरणी न्यायालयाने ठरवले दोषी

Subscribe

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पला कोर्टाने लैंगिक शोषण आणि मानहानीच्या प्रकरणात 50 लाख डॉलर्सचादंड ठोठावला आहे. 1990 च्या दशकात एका महिलेने ट्रम्प यांनी त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले होते. त्याच प्रकरणी कोर्टाकडून आता हा निकाल देण्यात आला आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मॅनहॅटन फेडरल कोर्टाकडून मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे लैंगिक शोषण आणि मानहानीच्या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. (Donald Trump found guilty of sexual misconduct by a court) तर या प्रकरणी त्यांना 50 लाख डॉलरचा दंड ठोठावला आहे. 1990 च्या दशकात एका महिलेने ट्रम्प यांनी त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले होते. त्याच प्रकरणी कोर्टाकडून आता हा निकाल देण्यात आला आहे. त्यामुळे आता ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. याआधी सुद्धा ट्रम्प यांच्यावर एका महिलेने आरोप केले होते.

हेही वाचा – शोध बेपत्ता मुलींचा : बेपत्ता मुलींचा होतोय परराज्यात व्यापार; मानवी तस्करीची मोठी साखळी

- Advertisement -

1990 मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मासिकाच्या लेखिका ई जीन कॅरोल या महिलेवर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर त्या महिलेची बदनामी देखील केली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे मंगळवारी, नऊ सदस्यीय न्यायाधीशांच्या एका खंडपीठाने ट्रम्प यांना 50 लाख डॉलर्सचा दंड ठोठावत त्या महिलेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

परंतु, याआधी मॅनहॅटन फेडरल न्यायालयातील न्यायाधीशांना ट्रम्प यांनी सदर महिलेचे लैंगिक शोषण केले नसल्याचे आढळून आले. तर स्वतः ट्रम्प यांनी त्या महिलेवर कोणत्याही प्रकारचा हल्ला केला नसल्याचे सांगितले आहे. पण तत्पूर्वी या प्रकरणावर सुनावणी करताना तब्बल तीन तास चर्चा करण्यात आली. या प्रकरणी गेल्या दोन आठवड्यांपासून सुनावणी सुरु होती. पण या कोणत्याही सुनावणीला ट्रम्प उपस्थित राहिले नसल्याचे सांगण्यात आले आहे. पण त्यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, 79 वर्षीय कॅरोलने खटल्यादरम्यान साक्ष देताना सांगितले की, 70 वर्षीय ट्रम्पने 1995-1996 मध्ये मॅनहॅटनमधील बर्गडोर्फ गुडमन डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये ड्रेसिंग रूममध्ये तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर ऑक्टोबर 2022 मध्ये त्याने त्याच्या इंटरनेट प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहून आपली प्रतिष्ठा खराब केल्याचेही या महिलेकडून सांगण्यात आले आहे.

2017 ते 2021 पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेले अध्यक्ष ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी जनमत चाचण्यांमध्ये आघाडीवर आहेत. मात्र, न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे त्यांच्या या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisment -