…तर सॅनिटायझरचं इंजेक्शनच मारा; ट्रम्प यांचा डॉक्टरांना अजब सल्ला

रूग्णांच्या शरीरात अल्ट्राव्हायोलेट लाइटच्या सहाय्याने या प्राणघातक विषाणूचा नाश होऊ शकतो का, असा प्रस्तावही डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडला.

trump tatya
...तर सॅनिटायझरचं इंजेक्शनच मारा; ट्रम्प यांचा डॉक्टरांना अजब सल्ला

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धक्कादायक विधान केलं आहे. कोरोनावर अद्याप लस सापडलेली नाही. असं असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी अजब सल्ला दिला आहे. शरीरात जंतूनाशक (सॅनिटायझर्स) इंजेक्शन देण्यामुळे कोरोना विषाणू बरा होतो की नाही याचा अभ्यास केला पाहिजे, असं ट्रम्प यांनी शास्त्रज्ञांना सुचवलं आहे. ट्रम्प यावरच थांबले नाहीत तर, रूग्णांच्या शरीरात अल्ट्राव्हायोलेट लाइटच्या सहाय्याने या प्राणघातक विषाणूचा नाश होऊ शकतो का, असा प्रस्तावही त्यांनी मांडला. हे विधान केल्यांनतर ट्रम्प यांची जगभर खिल्ली उडवली जात आहे..

वृत्तसंस्था एएफपीच्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या विधाना नंतर अमेरिकन आरोग्य तज्ज्ञांना पुढे यावं लागलं. नागरिकांनी अशा ‘धोकादायक’ सूचनांकडे लक्ष देऊ नका, असं तज्ज्ञांनी सांगितलं. सूर्यप्रकाशामुळे आणि आर्द्रतेमुळे कोरोनो विषाणूचा झपाट्याने अंत होत आहे, असं होमलँड सिक्युरिटी फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे (Homeland Security for Science and Technology) सचिव बिल ब्रायन यांनी आपल्या विभागाच्या अभ्यासाचा निकाल सादर करताना सांगितलं. पुढे ते असंही म्हणाले की आयसो प्रोपिल अल्कोहोल ३० सेकंदात कोरोना विषाणूचा नाश करतं. यावेळी अध्यक्ष ट्रम्प देखील उपस्थित होते.


हेही वाचा – वाढत्या शहरीकरणामुळे नव्या आजारांना निमंत्रण; ब्रीटनच्या शास्त्रज्ञांचा दावा


अप्पर सचिव बिल ब्रायन यांच्या या विधानाने ट्रम्प यांना धक्का बसला आणि ते म्हणाले की “तर मग विषआणूला मारण्यासाठी संक्रमित व्यक्तीमध्ये जंतूनाशक इंजेक्शन दिले जाऊ शकतं. ट्रम्प पुढे म्हणाले की रसायनांचे इंजेक्शन देऊन विषाणू एका मिनिटात मारता येतो. याबद्दल चौकशी करणे फारच मनोरंजक असेल. शरीरावर अल्ट्राव्हायोलेट किंवा अत्यंत शक्तिशाली किरणे मारता येतातका म्हटलं तेव्हा तर आपण म्हणालात की अद्याप त्याची चाचणी झालेली नाही. परंतु मी असं म्हणतो की आपण त्याची चाचणी घेणार आहात.” अशा प्रकारे त्यांनी परवानगी देऊन टाकली म्हणावं लागेल.