Homeदेश-विदेशIllegal Immigrants in US : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा भारतीयांना झटका, अवैध स्थलांतरितांना...

Illegal Immigrants in US : राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा भारतीयांना झटका, अवैध स्थलांतरितांना पाठवले मायदेशी

Subscribe

अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील जन्मसिद्ध नागरिकत्वाचा कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय अमेरिकेच्या इमिग्रेशन धोरणात झालेला मोठा बदल दर्शवतो. याचपार्श्वभूमीवर आता अवैध स्थलांतरितांना आपल्या मायदेशात पाठवण्यासाठी अमेरिकन प्रशासनाकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. भारतीयांची यादीही समोर आली आहे.

नवी दिल्ली : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर अनेक मोठ्या निर्णयांचा धडाका लावल्याचे पाहायला मिळाले. यात अमेरिकेतील जन्मसिद्ध नागरिकत्वाचा कायदा रद्द करण्याचा निर्णयाचाही समावेश होता. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हा निर्णय अमेरिकेच्या इमिग्रेशन धोरणात झालेला मोठा बदल दर्शवतो. याचपार्श्वभूमीवर आता अवैध स्थलांतरितांना आपल्या मायदेशात पाठवण्यासाठी अमेरिकन प्रशासनाकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. भारतीयांची यादीही समोर आली आहे. (Donald Trump orders deportation of foreigners living in the US illegally)

डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी राष्ट्रध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अमेरिकेतून बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. यानंतर अमेरिकेने एकूण 205 भारतीयांना निर्वासित करण्यासाठी चिन्हांकित केले आहे. यातील 186 भारतीयांना डिपोर्ट करण्याची यादी समोर आली आहे. अमेरिकन प्रशासनाने सी-17 या लष्करी विमानातून 104 भारतीयांच्या पहिल्या तुकडीला मायदेशात पाठवले आहे. आज (5 फेब्रुवारी) दुपारी 104 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन येणारे अमेरिकन लष्करी विमान अमृतसरमधील श्री गुरु राम दास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. मात्र उर्वरित लोक कुठे आहेत आणि त्यांना भारतात कधी पाठवले जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा – Mallikarjun Kharge : तुझ्या वडिलांचा मी सहकारी, चूप बस खाली; संसदेत मल्लिकार्जुन खर्गेंचा संताप कोणावर? 

आता अमेरिकेतून हद्दपार केलेल्या भारतीयांमध्ये पंजाबचे 30, हरियाणा आणि गुजरातचे प्रत्येकी 33 जण, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशचे 3 आणि चंदीगडचे 2 जण आहेत. तथापि, हद्दपार केलेल्या लोकांची संख्या अद्याप अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. मात्र दावा करण्यात येत आहे की, अमेरिकन लष्करी विमान सी-17 मध्ये 205 बेकायदेशीर स्थलांतरित होते. अमेरिकन सरकारने बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना हद्दपार करणारी ही पहिलीच तुकडी आहे. मात्र गेल्या दोन आठवड्यात भारताव्यतिरिक्त इतर देशांतील बेकायदेशीर स्थलांतरितांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले आहे. यात ग्वाटेमाला, पेरू आणि होंडुरास येथील लोकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.

बेकायदेशीर 18000 भारतीयांची ओळख पटली

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होताच त्यांनी अमेरिकत राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकन वृत्तसंस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारत आणि अमेरिकेने अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत असलेल्या सुमारे 18000 भारतीयांची ओळख पटवली आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या आठवड्यात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. यांच्यासोबत बेकायदेशीर स्थलांतरितांशी संबंधित समस्या सोडवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

हेही वाचा – Delhi Election 2025 : मनीष सिसोदीयांसमोर मोदी-मोदी, ‘आप’चे कार्यकर्ते बघतंच राहिले; व्हिडीओ व्हायरल