घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटट्रम्प यांना रुग्णालयातून दिला डिस्चार्ज, व्हाइट हाऊसवर येताच मास्क काढून ठेवला खिशात

ट्रम्प यांना रुग्णालयातून दिला डिस्चार्ज, व्हाइट हाऊसवर येताच मास्क काढून ठेवला खिशात

Subscribe

व्हाइट हाऊसचे डॉक्टर सीन कोनले यांनी ट्रम्प अजूनही पूर्णपणे बरे झालेले नाही असे सांगितले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना व्हाइट हाउस येथे शिफ्ट करण्यात आले आहे. ट्रम्प यांच्यावर वॉल्टर रीड रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान ट्रम्प यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर हेलिकॉप्टरमधून प्रवास करून ते व्हाइट हाऊसला पोहोचले आहेत. ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसला पोहोचताच चेहऱ्यावरचा मास्क काढल्याचे दिसले. पण याचदरम्यान व्हाइट हाऊसचे डॉक्टर सीन कोनले यांनी ट्रम्प अजूनही पूर्णपणे बरे झालेले नाही असे सांगितले आहे.

सीएनएन सांगितले की, ‘ट्रम्प यांनी हेलिकॉप्टरद्वारे प्रवास करून व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी मास्क काढून तो खिशात ठेवला. मग बाल्कनीतून लोकांकडे पाहून हात दाखला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळल्याबाबत ट्रम्प यांनी देखील ट्विट केले आहे. यावेळी ते म्हणाले की, कोरोनाला घाबरू नका. आम्ही ट्रम्प प्रशासनात या व्हायरसच्या विरोधात काही जबरदस्त औषधं आणि माहिती मिळवली आहे.’

- Advertisement -

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मेडिकल टीम म्हणाली की, ‘सध्या ते पूर्णतः बरे झाले नाही आहेत, पण ते घरी जाऊ शकतात. त्याचे ऑक्सिजन लेव्हर सामान्य आहे. त्यांना व्हाइट व्हाऊसमध्ये रेमडेसिवीरचा पाचवा डोस दिला जाईल.’

- Advertisement -

आता यानंतर ट्रम्प यांची बिडेन यांच्यासोबत होणाऱ्या डिबेटची तारिख निश्चित झाली आहे. १३ ऑक्टोबरला हे डिबेट मियामीमध्ये होईल.


हेही वाचा – जम्मू काश्मीर : पाकने केले शस्त्रसंधीचे उल्लंघन; राजौरीत भारतीय लष्कर अधिकारी शहीद


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -