घरदेश-विदेशट्रम्प म्हणतात, कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण ही अमेरिकेसाठी अभिमानाची बाब

ट्रम्प म्हणतात, कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण ही अमेरिकेसाठी अभिमानाची बाब

Subscribe

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण ही अमेरिकेसाठी अभिमानाची बाब आहे, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं.

अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अजब विधान केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की सर्वाधिक रुग्ण ही आम्च्यासाटी अभिमानाची बाब आहे. अमेरिकेत सर्वाधिक रुग्ण आहेत म्हणजे आम्ही अधिकाअधिक लोकांची तपासणी करत आहोत. अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असून सर्वाधिक मृत्यूही अमेरिकेत झाले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी म्हणाले की, आमच्याकडे सर्वाधिक रुग्ण आहेत…काही प्रमाणात मी ते चांगले मानतो. कारण आमची तपासणी खूप चांगली आहे. कोविड-१९ साथीच्या रोगाचा प्रसार झाल्यानंतर ट्रम्प यांनी प्रथमच मंत्रिमंडळाची बैठक घेतली. ते म्हणाले, जेव्हा आपण म्हणता की कोरोनाच्या बाबतीत आम्ही जगात आघाडीवर आहोत, तर याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे इतरांपेक्षा अधिक चाचणी सुविधा आहेत. ते पुढे म्हणाले, म्हणून सर्वाधिक रुग्ण आहेत हे मी वाईट मानत नाही. एक प्रकारे मी हे चांगलं लक्षण समजतो कारण आपण सर्वाधिक चाचण्या करण्यात येत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाच्या काळातही उध्दव ठाकरेंना शुभेच्छा देणारे फलक वांद्र्यात झळकले


डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीने राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यावर ट्विट करत टीका केली आहे. अमेरिकेत कोविड-१९ चे १५ लाख रुग्णांची संख्या ही अपयशी नेतृत्व दर्शवतं. तथापि, डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ते लॅटिन अमेरिकन देशांमधील प्रवास थांबवण्याचा विचार करीत आहेत. अमेरिका आणि रशियानंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक २ लाख ७१ हजार ८८५ कोरोनाचे रुग्ण आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -