Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढणार? आणखी एका महिलेकडून लैंगिक छळाचा आरोप

डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढणार? आणखी एका महिलेकडून लैंगिक छळाचा आरोप

Subscribe

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण लैंगिक शोषण केल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर असून नुकताच आणखी एका महिलेने डोनाल्ड ट्रम्प यांनी विमानात लैंगिक छळ केल्याचा दावा केला आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण लैंगिक शोषण केल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर असून नुकताच आणखी एका महिलेने डोनाल्ड ट्रम्प यांनी विमानात लैंगिक छळ केल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे संबंधित महिलेने लैंगिक डोनाल्ड ट्रम्प यांनी छळ केल्याचा दावा न्यायालयात केला असून आपली बाजूही मांडली. परंतु, असे असले तरी, डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे याप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (donald trump sexual misconduct allegations assaulted woman on flight)

मिळालेल्या माहितीनुसार, न्यूयॉर्क येथील न्यायालयात सुरू असलेल्या एका केसच्या सुनावणीवेळी या महिलेने दावा केला. त्यानुसार, ‘1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात विमानामध्ये प्रवास करत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी लैगिंक छळ केला. जेसिका लीड्स असे त्यांचे नाव असून त्यांनी लेखक ई. जीन कॅरोल यांच्या बलात्कार आणि मानहानीच्या प्रकरणात माजी राष्ट्रपतींविरुद्ध साक्ष देताना यांनी हे आरोप केले आहेत.

- Advertisement -

जेसिका लीड्स यांनी केलेले सर्व आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळून लावले आहेत. मात्र असे असले तरी, लीड्सने यांनी कोर्टात दावा केला की, ट्रंप यांनी 1978 किंवा 1979 मध्ये न्यूयॉर्कला जाणाऱ्या विमानामध्ये बिझनेस क्लासमध्ये त्यांचा स्कर्ट वर करत लैंगिक छळ केल. लीड्स, आता 81 वर्षांच्या आहेत. आम्ही बिझनेस क्लासमध्ये एकमेकांशी बोललोही नाही. त्यांनी थेट लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला असाही दावा या महिलेनं केला आहे.

2016 च्या मतदानापूर्वी पॉर्न स्टारला पैसे देण्याच्या आरोपात डोनाल्ड ट्रम्प दोषी असल्याचे सांगण्यात आले होते. जॉर्जियाच्या दक्षिणेकडील राज्यात ट्रम्प यांची निदर्शने, व्हाईट हाऊसमधून घेतलेल्या कागदपत्रांची कथित गैरव्यवहार आणि 6 जानेवारी 2021 रोजी त्यांच्या समर्थकांकडून यूएस कॅपिटलवर झालेल्या हल्ल्यात त्यांचा सहभाग याचीही चौकशी केली जात आहे.


- Advertisement -

हेही वाचा – Cyclone Mocha: येत्या 48 तासांत बंगालच्या उपसागरात ‘मोचा’ चक्रीवादळाची होणार निर्मिती

- Advertisment -